”महाराष्ट्र केसरी न्यूज च्या बातमिची दखल” मुख्य मार्गावरील मटन मार्केट हटले


सडक अर्जुनी, दिनांक : ११ फेब्रुवारी २०२३ : कुणबी समाज भवनासमोर स्थानिक प्रशासनाची दलीन्दरी या शीर्षकाखाली ३१ जानेवारी २०२३ रोजी महाराष्ट्र केसरी न्यूज ने एक बातमी प्रकाशित केली होती. त्या बातमीची स्थानिक प्रशासनाने दखल घेत तात्काळ कार्यवाई केली आहे. गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुका अंतर्गत येणाऱ्या ग्राम सौन्दड येथील प्रकरण आहे. नेमक बातमीत काय मुद्दे होते ते पाहू. गावातील धुकी माता परिसरात देशी दारूची भट्टी अश्ल्याने या मार्गावर दारूड्यांची रोज जणू मुख्य मार्गावर जत्रा भरते. महिलांना या ठिकाणावरून जाण्यासाठी भीती वाटते. हे ठिकाण सद्या भीती दायक झाले आहे. त्यातच या ठिकाणी कुणबी समाजाचे समाज मंदिर आहे. संत तुकाराम महाराज यांच्या मूर्ती समोर रोज मासे कापली जातात. कोंबड्या कापल्या जातात. त्यातच त्यांची घाण त्याच ठिकाणी फेकली जाते.

1) हे ही वाचा : कुणबी समाज भवनासमोर स्थानिक प्रशासनाची दलीन्दरी 

2) हे ही वाचा : महसूल विभाग सक्रीय; महाराष्ट्र केसरी न्यूज च्या बातमीची दखल.

३) हे ही वाचा : अखेर त्या बातमीची दखल, अपिलीय अधिकाऱ्यांचे नाव बदलले. 

४) हे ही वाचा : महाराष्ट्र केसरी न्यूज च्या बातमीचा दणका… अन पोलीस विभाग लागले कामाला! 

मार्गाच्या बाजूला अश्लेल्या नालीत घाणीचे साम्राज्य पसरले आहे. गेली पाच वर्षे या नाल्या स्वछ केल्या की नाही. असे चित्र निर्माण झाले आहे. अनेक बातम्या लाऊन सुधा गेंड्याच्या कातडीचे प्रशासन यावर कुठीलीही कार्यवाई करीत नाही. स्थानिक प्रशासनाने गावात दलीन्दरी पसरवली असून नवनिर्वाचित सरपंच यांनी कुणबी सामाजातील लोकांच्या भावना समजून घ्यावा असे अनेक मुद्दे बातमी मध्ये होते. त्या अनुसंघाने स्थानिक प्रशासनाने मुख्यमार्गावरील मटन मार्केट हटविले आहे. देशी दारूच्या दुकान धारकाला सदर जागेवरून दुकान दुशरीकडे स्थलांतरीत करण्या करिता नोटीस बजावले आहे. मात्र कुणबी समाज भवनासमोरील नाली अध्याप स्वछ झाली नसून ती लवकरच स्वछ करू असे आश्वासन प्रशासनातर्फे मिळाले आहे.

 


 

Leave a Comment