सडक अर्जुनी, गोंदिया, ( बबलु मारवाडे ) दिनाक : 08 फेब्रुवारी 2023 : तहसिलदार बदलले मात्र अपिलीय अधिकारी जुनेच? या शिर्षका खाली महाराष्ट्र केसरी न्युज ने 31 जानेवारी 2023 रोजी एक बातमी प्रकाशित केली होती. त्या अनुसंघाने महसूल विभागाने बातमीचे गांभीर्य लक्षात घेता जुन्या अपिलीय अधिकारी यांचे नाव बदलून नव्या अपिलीय अधिकर्यांचे नाव बोर्ड वर लिहिले आहे.
माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत शासकीय कार्यालयाच्या मुख्य भागात सहाय्यक जनमाहिती अधिकारी, जनमाहिती अधिकारी, आणि अपिलीय अधिकारी जे सध्या स्थितीत कार्यरत आहेत. अश्या अधिकाऱ्यांचे नाव बोर्डावर लिहून ते बोर्ड दर्शनी भागात लावणे बंधन कारक आहे. माहिती अधिकार हा केंद्राचा कायदा आहे. असे असले तरी महसूल विभागातील अधिकारी या कायद्याला पायदळी तुडवत असल्याचे चित्र आहे.
अपिलीय अधिकाऱ्यांचे चार्चज तहसीलदारांकडे असते. पूर्व तहसीलदार किशोर बागडे यांची बदली नंतर देखील त्यांचे नाव गेली दोन महिन्यापासून बोर्ड वर होते. मात्र बातमी लावताच गणेश खताडे या नव्या तहसीलदारांचे नाव बोर्ड वर लिहिण्यात आले आहे. हे खरे मात्र जनमाहिती अधिकारी यांच्या नावात कुठलाही बदल केल्याचे बोर्ड वर दिसत नाही.
जनमाहिती अधिकारी म्हणून एन.एम. गावड नायब तहसीलदार यांचे नाव आजही बोर्डवर पाहण्यास मिळते. विशेष म्हणजे नायब तहसीलदार गावड हे एक दोन नाही तर तब्बल 18 विभागाचे जन माहिती अधिकारी बोर्ड वरील माहिती नुसार आहेत. पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे सप्टेंबर 2022 पासून ते सडक अर्जुनी तहसील कार्यालयात नसून गेली 5 ते 6 महिन्या पासून ते देवरी तहसील कार्यालयात कार्यन्वित आहेत. आता हे तहसील प्रशासनाच्या डोक्यात का आले नाही? हा संशोधनाचा विषय आहे. सरकारी काम आणि सहा महिने थांब ही म्हण अगदी सहज बसते. एमपीएससी झालेले अधिकारी सामान्य माणसाला कसा फिरवायचे हे आदी शिकतात अशी चर्चा जन माणसात आहे.