सौंदड, दि. 02 जानेवारी : लोहिया शिक्षण संस्था द्वारा संचालित रामेश्वरदास जमनादास लोहिया माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय, रामदेवबाबा अध्यापक विद्यालय व जमुणादेवी लोहिया प्राथमिक शाळा, सौंदड यांच्या संयुक्त विद्यमाने जगदीश लोहिया, संस्थापक – संस्थाध्यक्ष, लो.शि. संस्था, सौंदड यांच्या प्रेरणेने दि. 03 जानेवारी रोज शुक्रवारला विद्यालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन म्हनुण आनंदराव घाटबांधे उपाध्यक्ष लोहिया शिक्षण संस्था यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली.
यावेळी प्रमुख अतिथि प्राचार्या उमा बाच्छल, गुलाबचंद चिखलोंडे, मुख्याध्यापक मनोज शिंदे, पर्यवेक्षक डी. एस. टेंभुर्णे, प्राध्यापक आर.एन. अग्रवाल, स. शिक्षिका सौ. कल्पना काळे, स. शिक्षक टी. बी. सातकर यांनी माता सरस्वती व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्राचार्या तसेच विद्यालयातील शिक्षकांनी सावित्रीबाईंच्या कार्याची विस्तृत माहिती देत विद्यार्थांना मार्गदर्शन केले. विद्यार्थीनींनी सावित्रीबाईंच्या वेशभूषेत त्यांचे जीवन चरित्रावर एक पात्री अभिनय सादर केले. विद्यार्थ्यांनी गीत व भाषणातून सावित्रिबाईंचा गुणगौरव केला. कार्यक्रमानंतर वक्तृत्व, निबंध, व चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन स. शिक्षिका कु. वाय. एम. बोरकर यांनी केले, तर आभार प्राध्यापक टी.टी. निमजे यांनी मानले.