तहसीलदार बदलले मात्र अपिलीय अधिकारी जुनेच?


सडक अर्जुनी, दिनांक : ३१ जानेवारी २०२३ : तहसील कार्यालय सडक अर्जुनी येथील तत्कालीन तहसीलदार बदलून जवळपास दोन महिन्याचा कालावधी झाला. नव्या तहसीलदारांनी देखील पदभार सांभाळला मात्र अपिलीय अधिकारी यांचे नाव अध्याप बोर्ड वरून बदलेले नाही. तर जुन्याच तहसीलदारांचे आजही नाव बोर्डवर लिहिले अश्ल्याने नागरिकात संभ्रम निर्माण झाला आहे. तत्कालीन तहसीलदार किशोर बागडे हे होते. तर नव्याने रुजू झालेले तहसीलदार गणेश खताडे हे आहेत.

माहिती अधिकार कायदा २००५ हा केंद्राचा कायदा अशला तरी त्या कायद्याला कुनीही जुमानत नाही. माहिती अधिकाराचे बोर्ड दर्शनी भागात लावणे गरजेचे आहे. अशे अशले तरी सदर बोर्ड इमारतीच्या कोपर्यात लावलेले चित्रात दिसते. त्यातच त्याच्या बाजूला काही साहित्य लाऊन त्याला लपविण्याचा प्रयत्न संबंधित प्रशासनाकडून केला जात आहे. जेणेकरून लोकांना तो दिसू नये असा हेतू स्पस्ट होत आहे.

माहिती अधिकार कायदा २००५ मध्ये प्रतेक प्रशासकीय कार्यालयाने आपली माहिती दर्शनी भागात कलम ४ अंतर्गत लाऊन माहिती प्रकट करणे बंधनकारक आहे. मात्र प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे कधीही कलम ४ अंतर्गत प्रशासकीय इमारती समोर माहिती प्रकट केल्याचे दिसत नाही. ही सोकान्तिका आहे. कायदा पास झाला मात्र त्यावर अध्याप अंमल बजावणी झाल्याचे दिसत नाही. तहसील कार्यालयात लावलेले माहिती अधिकाराचे बोर्ड तत्कालीन मराठी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष बबलू मारवाडे यांच्या निवेदना नंतर लावण्यात आले होते.


 

Leave a Comment