सडक अर्जुनी, दि. 03 : थोर समाजसेविका सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून मुजम्मील सैय्यद यांच्या मार्गदर्शनात स्थानिक पैराडाईस किड्स केअर इंग्लिश स्कूल या शाळेत सावित्री-फुले वेशभूषा स्पर्धा ठेवण्यात आली ज्या मध्ये नर्सरी ते वर्ग तिसरीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेच्या मुख्याध्यापिका राजश्री बडोले व संचालक संतोष राऊत यांनी पुष्पगुच देऊन पाहुण्यांचे स्वागत केले.
सावित्रीबाईच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. तद्नंतर सौन्दड गावात त्याच वैशभूषेत विद्यार्थ्यांची मिरवणूक काढण्यात आली. सावित्री म्हणून शिकल्या मुली” अश्या वेगवेगळ्या घोषणांनी संपूर्ण सौन्दड नगरी दुमदुमून गेली. विद्याथ्यांचं उत्साह पाहण्यासारखा होता. परीक्षक म्हणून जिल्हा परिषद माध्यमिक शाळा, सौन्दडचे मुख्याध्यापक के. के. मेश्राम व त्यांच शाळेतील सहायक शिक्षक डी. जी. कापगते सर यांनी निरीक्षण करून प्रथम, दद्वितीय व तृतीय क्रमांकाचे विद्यार्थी निवडून त्यांना स्वर्ण, रजत व कांस्य पदक देवून त्यांचा गौरव केला.
या स्पर्धेत नर्सरी वर्गातून प्रथम क्रमांक कु. स्वाक्षरी रामटेके, केजी मधून प्रथम क्रमांक आलीया वर्मा, द्वितीय श्रेयांस मेढे, तसेच के जी 2 मधून प्रथम अंशिका जांभूळकर, द्वितीय आनंद रामटेके, तृतीय आवी नागरिकर, तसेच, पहिल्या वर्गातून प्रथम वेदांती कोटांगले, द्वितीय अनुष्का गहाणे तर तृतीय अविक श्रीवास्तव, तसेच वर्ग दुसरीतून प्रथम क्रमांक राधा सिंधी मेश्राम, द्वितीय स्वरा म्हस्के, तृतीय निशांत बारबुद्धे, तसेच तिसऱ्या वर्गातून प्रथम क्रमांक संध्या चंदनबटवे, द्वितीय परिधी कापगते तर तृतीय क्रमांक आरोही डोंगरे या विद्याथ्यांनी पटकाविला. कार्यक्रमाचे संचालन सहायक शिक्षिका डोंगरकर तर आभार प्रदर्शन बिसेन यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता शाळेतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मोलाचे योगदान दिले.