एमटीडीसी रिसॉर्टचे आज होणार लोकार्पण, नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानातील रिसॉर्ट तब्बल आठ वर्षापासून धुडकात अवस्थेत पडून ?

सडक अर्जुनी, दि. 07 जानेवारी : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध नागझिरा व्याघ्र प्रकल्पत असलेल्या नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानतील रिसॉर्टचे आज लोकार्पण होणार आहे, नवेगावबांध जलाशय हे विदेशी पक्षाच्या आगमनासाठी प्रसिद्ध असलेले जलाशय आहे, येथे वर्षभर पर्यटकाची रेलचेल असते, त्याच दृष्टिकोनातून या ठिकाणी कोट्यावधी रुपये खर्च करून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) पर्यटकांच्या निवासासाठी रिसॉर्ट तयार केले. पण गेल्या आठ वर्षापासून या रिसाॅटचे लोकार्पण न झाल्याने ते तसेच धुळकात पडले होते.

मात्र आता या रिसॉर्टच्या लोकार्पणाचा मुहूर्त मिळाला असून आज दि. 07 जानेवारी रोजी दुपारी 01 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्य मंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्य मंत्री अजित पवार सह राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने लोकार्पण होणार आहे, नवेगावबांध येथे व्याघ्र प्रकल्प व राष्ट्रीय उद्यान असल्याने या ठिकाणी दरवर्षी 40 ते 50 हजार पर्यंटक भेट देतात.

यामध्ये विदेशातील पर्यटकांचा सुद्धा समावेश आहे. येथे येणाऱ्या पर्यटकांच्या निवासाची सोय व्हावी त्यांची गैरसोय होऊ नये या माध्यमातून पर्यटनाला चालना मिळावी या दृष्टिकोनातून शासनाने आठ वर्षापूर्वी नवेगावबांध येथे कोट्यावधी रुपये खर्च करून एमटीडीसीच्या माध्यमातून रिसॉर्टचे बांधकाम केले होते.

पण गेल्या आठ वर्षापासून त्याचे लोकार्पण न झाल्याने पर्यटकांना दुसरीकडे आसरा घ्यावा लागत होता. येथे निवासाची सोय योग्य नसल्याने पर्यटकांचा हिरमोळ होत होता. आता तब्बल आठ वर्षां नंतर या लोकार्पण सोहळ्याला मुहूर्त मिळाला आहे. राज्यात दोन वर्षे पूर्वी पासून महायुतीची सरकार असताना देखील या लोकार्पण सोहळ्याला का दिरंगाई झाली हे मात्र न उलघळणारे कोडेच आहे.

Leave a Comment

और पढ़ें