सडक अर्जुनी तालुक्यात पाच ठिकाणी सट्टा पट्टी खावटीचे सक्रिय अड्डे! कोण करणार कारवाई?

(संग्रहित छायाचित्र)

  • सडक अर्जुनी, सौंदड, पांढरी, सह अन्य ठिकाणी सक्रिय, कोट्यावधी रुपयांची उलाढाल, कारवाई कधी?

सडक अर्जुनी, ( बबलु मारवाडे ), दि. 06 जानेवारी : सट्टा पट्टी म्हणचे काय रे भावा ? असा प्रश्न अनेकांना पडतो मात्र या वेवसायात एक रुपया च्या मोबदल्यात नंबर लागल्यावर अनेक पटीने पैसे मिळतात, आणि याच लालसे पोटी, अनेकांना जमीन, सोने, वाहन, हेच नाही तर घरातील तांदूळ देखील विकावे लागतात, आज नाही तर उद्या माझा नंबर लागेल आणि मी लखपती होणार या पोकळ लालसे मुळे रस्त्यावर येऊन अनेक सट्टा पट्टी शौकीन भिकेला लागले आहेत. आणि यालाच मटका असेही म्हणतात.

आता यावर नियंत्रण करणारे प्रशासन खरंच कारवाई करते का, तर सरळ आणि सोप्या भाषेत आपण नाहीच म्हणू, कारण या व्यवसायात गुंतलेले धनाड्य लोक संबंधित यंत्रणेला आपल्या खिशामध्ये ठेवतात, म्हणजेच काय तर महिन्याच्या अखेरला त्यांना त्यांचा हप्ता मिळतो, आणि मनमोकळेपणाने या अवैध व्यवसायिकांना काम करण्याची संधी प्राप्त होतो, आता हा व्यवसाय गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे, वृत्तपत्रात बातम्या लागल्या की, नामस्काराला अधिकारी कारवाई करतातही मात्र हे व्यवसाय कायमचे बंद होत नाही, आणि याला कारण म्हणजे पुन्हा लालच च आहे.

यावर नियंत्रण ठेवणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना महिन्याला लाखो रुपये पगार मिळत असला तरी त्यांचं भागत नाही मग तालुक्यात सुरू असलेल्या अवैध व्यवसायिकांकडून महिन्याला जमा झालेली रक्कम हे खाल पासून वर पर्यंत वाटप केली जाते आणि त्यामुळेच या अवैध व्यवसायिकांच्या हिमती मोठ्या प्रमाणात वाढतात, कारण साहेब तर आपलेच आहेत, कारवाई करणार तरी कोण, आणि त्यामुळेच या अवैध व्यवसायामध्ये तरुण पिढी देखील गुंतली आहे.

लालच ही प्रत्येकाची कमजोरी असली तरी प्रशासकीय यंत्रणा यावर नियंत्रण करण्यासाठी निर्माण करण्यात आली आहे, मात्र कुंपणच शेत खात असेल तर रक्षण कोण करणार असाही सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे, सडक अर्जुनी तालुक्याचा विचार केला तर तालुक्यातील 50% गावांमध्ये हा व्यवसाय लपून-छपून सुरू आहे, आता डिजिटल युग झाल्याने, मोबाईल वरून सट्टा पट्टी घेण्याचे काम सुरू आहे, तालुक्यातील संपूर्ण पट्टी, दुपारी जमा होतो, त्यानंतर ओपन ची घोषणा केली होते, त्याचबरोबर दुपारनंतर सायंकाळची पट्टी जमा होतो, त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी ओपन आणि क्लोज मिळून आलेले दोन आकडी नंबर म्हणजेच सट्टापट्टीचा विजयाचा अंक असा मानला जातो.

आता यामध्ये अनेक कंपन्या आहेत, याच आधारावर ग्रामीण भागामध्ये, सट्टा पट्टीचा हा व्यवसाय सुरू आहे, आणि खावटीचा देखील काम तालुक्यातच केला जातो, तालुक्यातील काही नावाजलेली व्यक्ती हा व्यवसाय करतात, आणि याबाबत पुरेपूर माहिती पोलिसांना देखील आहे, मात्र पोलीस प्रशासन यावर नियंत्रण का करत नाही हा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे, सडक अर्जुनी तालुक्यातील डूग्गीपार पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या खेडोपाडी गावांमध्ये असलेल्या पानटपरी मध्ये, भाजी विक्रेत्यांच्या दुकानांमध्ये, हॉटेलमध्ये हा कार्यक्रम सर्रासपणे सुरू असतो.

या व्यसनाचे अधीन होऊन अनेक युवा पिढी भटकली आहे, त्यामुळे यावर आत्ताच नियंत्रण केल्यास अनेकांचे उध्वस्त होणारे परिवार वाचू शकतात. तालुक्यामध्ये रोज लाखो रुपयाचा सुरू असलेला हा काळाबाजार महिन्याला कोट्यावधीच्या घरात जातो, आणि इथून मिळालेला नफा खावटीमध्ये शामील असलेले पार्टनर वाटून घेतात, हा अवैध व्यवसाय काळ्या मार्गाने सुरू असला तरी मोठ्या इमानदारी देखील केला जातो हेही विशेष आहे. गोंदिया पोलीस तसेच डूगगीपार पोलीस यावर कारवाई करणार का असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे, कारवाई होऊ नये म्हणून 3 अंक किंवा 4 अंकांचाही वापर केला जातो.

Leave a Comment

और पढ़ें