- स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाईचा दणका
गोंदिया, दि. 5 जानेवारी : स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक पोलीस निरीक्षक दिनेश लबडे, यांचे मार्गदर्शनात गोंदिया जिल्ह्यातील पोलीस ठाणे आमगाव परिसरात अवैध कृती करणारे, अवैध शस्त्र बाळगणारे, चोरी घरफोडी करणाऱ्या गुन्हेगारांचा शोध, गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करीत असताना पथकास मौजा- रिसामा आमगाव, येथील स्थानिक नागरीकांकडुन माहिती प्राप्त झाली की, दिनांक- 01/01/2025 रोजी एक ईसम नामे- नरेश तिराले हा त्याचे जवळील अग्निशस्त्रा द्वारे लोकांच्या मनात भिती घालुन दहशत माजवत होता.
परंतु त्याच्या भितीमुळे लोकांनी त्याचेविरूध्द तक्रार दिलेली नाही, याबाबतची माहीती मा. वरिष्ठांना कळविण्यात येवुन मा. वरिष्ठांच्या निर्देश सूचना परवानगीने नमुद इसम व त्याच्या ताब्यातील अनिशस्त्राबाबत खातरजमा शहानिशा करून मिळालेल्या बातमीच्या आधारे पथकातील पोलीस अधिकारी-अंमलदार यांनी दिनांक 04/01/2025 रोजी रात्र दरम्यान छापा घालून कारवाई केली असता- अवैधरित्या विना परवाना अनिशस्त्र बाळगून दहशत माजविणारा ईसंम नामे – 1) नरेश उर्फ शैलेश सुरेश तिराले, वय- 34 वर्षे, रा.फुक्किमेटा ह.मु. रिसामा ता. आमगाव, जिल्हा- गोंदिया.
यास एका लोखंडी पिस्तुल व एक जिवंत काडतुस किंमती अंदाजे 35 हजार रूपयांचे सह ताब्यात घेण्यात आले. त्यास त्याचे ताब्यात अवैधरित्या मिळून आलेल्या अग्निशस्त्राबाबत सखोल चौकशी विचारपुस केली असता त्याने त्याचा मित्र ईसम नामे- 2) इजाज इस्माईल खान वय – 35 वर्षे, रा. मामा चौक, गोंदिया याचेकडून आणल्याचे सांगीतले, यावरून सदर ईसंम यास सुध्दा ताब्यात घेण्यात आले.
विनापरवाना अवैधरित्या अग्नीशस्त्र (पिस्तुल) बाळगुन सर्व सामान्य जनतेच्या मनात अग्निशस्त्राद्वारे भीती निर्माण करून दहशत पसरवील्याबद्दल नमूद दोन्ही आरोपीताविरूध्द कलम 3, 25 भारतीय हत्यार कायदयान्वये पोलीस ठाणे – आमगाव येथे गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. दोन्ही आरोपी यांना जप्त मुद्देमाल (पिस्तूल, काडतूस) सह पोलीस ठाणे- आमगाव पोलीसांचे स्वाधीन करण्यात आले असुन पुढील कायदेशीर कारवाई प्रक्रिया आमगाव पोलीस करीत आहेत.
![Maharashtra Kesari News](https://maharashtrakesarinews.in/wp-content/uploads/2024/05/cropped-Picsart_23-12-16_14-59-10-524-150x150.png)