बंद वाहनातून सागवान लाकडांची तस्करी, 13 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त !

  • आर.एफ.ओ. मिथुन तरोणे यांची कारवाई, लाकूड माफियांचे दणाणले धावे!

सडक अर्जुनी, दि. 06 जानेवारी : सडक अर्जुनी वनविभागाच्या पथकाने आज दि. 06 जानेवारी रोजी अवैध सागवान लाकडांची तस्करी करणाऱ्या एका टोळीवर कारवाई केली असून यात तब्बल 13 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम शेंडा कोयलारी या परिसरातून नागपूर कडे बंद वाहनातून सागवान लाकडांची अवैध रित्या तस्करी सुरू आहे, या बाबद ची माहिती येथील वनपरिक्षेत्र अधिकारी मिथुन तरोणे यांना मिळाली, माहिती मिळताच वाहनांचा पाठलाग करून वाहन ग्राम फुटाळा – सौंदड परिसरात पकडले.

पण वाहन चारही बाजूने बंद असल्याने व कुलूप बंद असल्याने त्यात नेमक आहे तरी काय हे सांगणे जरा अवघड होते, बंद वाहनातून सागवान लाकडांची तसक्करी होते हे ऐकायला जरा अवघडच आहे, विशेष म्हणजे वाहन चालकाने वाहन उघडण्यास नकार दिला होता, मात्र वन विभगाच्या अधिकाऱ्यांनी सदर वाहन वन विभागाच्या कार्यालयात आणून त्याची तपासणी केली असता त्या मधे लाखो रुपये किमतीचा सागवान लाकूड मिळून आला.

या तस्करीत वापरण्यात आलेले वाहन महिंद्रा कंपनीचे बोलेरो पिकअप वाहन क्र. एम.एच. 40 बी.जी. 3801 असे असून ओम लोजिस्टीक लिमिटेड नावाचा निळा/पांढरा रंगाचा हा वाहन आहे. वन विभागाने दिलेल्या माहिती नुसार मिळालेलं लाकूड 13 नग असून 1.910 घान मिटर येवढे आहे. वाहनासह अंदाजे किंमत 13 लाख रुपये एवढी आहे. 4 आरोपी विरुद्ध भारतीय वन अधिनियम 1927 चे कलमान्वये वनगुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील चौकशी सुरू आहे.

यातील आरोपी नामे 1) जितेंद्र रमेश राऊत, वय 38 वर्षे कळमेश्वर ता. कळमेश्वर जि. नागपूर, 2) गुणवंत धनराज फुन्ने, वय 40 वर्षे रा. गुमथळा, ता. कळमेश्वर जि. नागपूर, 3) अनुज अशोक भोयर, वय 22 वर्षे, रा. परसोडी ता. कळमेश्वर जि. नागपूर असे असून फरार आरोपी 4) दिनेश भोंडे रा. शेंडा ता. सडक अर्जुनी असे आहे. आज तिन्ही आरोपींना सडक अर्जुनी येथील मा. न्यायालयासमोर हजर केले असता 3 दिवसाची वन कोठडी आरोपींना सुनावली असून फरार आरोपीचा शोध सुरू आहे. हा आरोपी मिळाल्यास सदर लाकडे कुठून आणले व सोबत अजून कोण शामिल आहेत या बाबत ची माहिती समोर येईल. वन अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार अश्या पद्धतीने लाकडांची तस्करी करण्याची ही तिसरी वेळ आहे.

सदर कारवाई मिथुन तरोणे, वनपरिक्षेत्र अधिकारी सडक अर्जुनी, कुमारी व्ही.बी. रहिले क्षेत्रसहायक शेंडा, एस.के. पटले क्षेत्रसहायक कोहमारा, कुमारी व्ही.आर. ब्राम्हणकर वन रक्षक शेंडा, कु. शालु मेंढे वन रक्षक पांढरवाणी, पि.एम. पटले वन रक्षक सौंदड, मुकेश चव्हान, पि.बि. हत्तीमारे वन रक्षक डूग्गीपार, डी.डी. माहूरे वन रक्षक कोयलारी, कुमारी टी. आर. भेलावे, समिर बंसोड वाहन चालक, विपुल शहारे, किशोर बडवाईक यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. पकडलेल्या वाहनातील लाकडे डोंगरगाव डेपो येथे ट्रॅक्टरच्या माध्यमातून हलवण्यात आले आहेत.

Leave a Comment

और पढ़ें