- १६ लक्ष १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त, ७ आरोपींवर पोलिसांची कारवाई
आमगाव, दि. ०५ जानेवारी : पोलीस निरीक्षक तिरुपती अशोक राणे यांच्या नेतृत्वात आमगांव पोलीसानी अवैध रित्या वाळूची वाहतूक करणाऱ्या दोन वाहनांवर कारवाई केली आहे. गुप्त माहितीच्या आधारे अवैध गौण खनीज ( रेतीची) वाहतूक करत असलेल्या दोन ट्रॅक्टरवर पोलीसांनी ही जप्तीची कारवाई ३ जानेवारी रोजी केली आहे, यात तब्बल १६ लक्ष १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पेट्रोलिंग दरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की, वाघनदी पात्रातून मुंडीपार येथील मारबत घाटातून अवैध रेती उत्खनन व वाहतूक केली जात आहे. त्यानुसार, घाटटेमनी बीट परिसरात सापळा रचला यात दोन ट्रॅक्टर मध्ये वाळू भरली होती, पोलिसांनी सदर वाळूचा परवाना बाबत विचारपूस केली असता, वाहन धारकाकडे कुठलाही परवाना उपलब्ध नसल्यामुळे ही जप्तीची कारवाई पोलिसांनी केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वाळूची किंमत ६ हजार रुपये प्रति ब्रास व २ ट्रॅक्टर अशी दोन्ही ट्रॅक्टर मिळून एकूण किंमत १६ लक्ष १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून कारवाईत सात आरोपींना ताब्यात घेतले आहे, आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. १) ट्रॅक्टर क्रमांक – एम.एच. ३५ ए.आर. ३००२ व ट्रॉली सोबत असून २) दुसरा ट्रॅक्टर क्रमांक : एम.एच. ३५ ए.जे. १८५५ ट्रॉली सोबत असून दोन्ही वाहनात वाळू भरली होती. या गुन्ह्यात आरोपी लखन खेमचंद मानकर, पुनम सुखराम मळावी, राजेंद्र नंदलाल बोपचे, टीकाराम श्रीराम मेश्राम, संदीप मंगलु दखनकर, हितेश रोशनलाल शिरसावुत, शुभम राजेंद्र बोपचे, सर्व आरोपी राहणार मुंडीपार तालुका आमगाव यांच्या विरुद्ध आमगाव पोलीस स्थानकात भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) ३ (५) अन्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा. आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक तिरुपती राणे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक नरेश सहारे, पोलीस हवालदार खुशालचंद बर्वे, लिखीराम दसरे, विनोद उपराडे, चेतन शेंडे, असीम मन्यार, नितीन चोपकर यांनी कारवाई केली आहे. या कारवाईने अवैध गौण -खनीज उत्खन करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.