- मंत्री झाल्यानंतर आशिष जयस्वाल पत्नी सह यांचा गोंदिया जिल्ह्याचा पहिलाच दौरा.
गोंदिया, दि. 05 जानेवारी : शिवसेना शिंदे गटाचे आमदार व राज्यमंत्री आशिष जयस्वाल हे दि. 05 जानेवारी रोजी गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांचे गोंदियात आगमन होताच शिवसेना जिल्हा प्रमुख मुकेश शिवहरे यांनी भव्य बाईक रॅली काढत शिवसैनिकांनी त्यांचे जंगी स्वागत केले. आशिष जयस्वाल हे मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच सह पत्नी गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता शिव सैनिकांनी त्यांच्या स्वागतासाठी मोठी गर्दी केली होती, या वेळी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली तर गोंदिया येथील साशकीय विश्रामगृह गोंदिया विधानसभा क्षेत्राचे आमदार विनोद अग्रवाल यांनी राज्य मंत्री आशिष जयस्वाल यांची भेट घेत त्यांचे स्वागत केले
तर यावेळी मंत्री आशिष जयस्वाल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उप मुख्यमंत्री एकनाथ शिन्दे, अजित पवार यांनी माझ्यावर ज्या ज्या विभागांची जबाबदारी दिली आहे ते योग्य पणे पार पाडणे कोणत्या जिल्याचा पालकमंत्री होणे हे माझे ध्येय नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले, त्यामुळे येत्या काळात गोंदिया जिल्याला पालक मंत्री म्हणून कोण लाभतो याकडे सर्वांचे लक्ष वेधून आहे.
बीड प्रकरणावरून मंत्री आशिष जयस्वाल यांचा विरोधकांना टोला.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग चे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणांमध्ये महायुतीचे नेते धनंजय मुंडे यांच्या राजीनामाची मागणी विरोधकांकडून करण्यात आली होती. यावरून बोलताना शिवसेना शिंदे गटाचे नेते मंत्री आशिष जयस्वाल यांनी विरोधकांना टोला लगावला असून प्रत्येक गोष्टीचा राजकीय भांडवल करायचा नसते, बीड प्रकरणांमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः गृहमंत्री असून ते जो कुणी आरोपी असेल त्याच्यावर कठोर कारवाई करतील अशी प्रतिक्रिया मंत्री आशिष जयस्वाल यांनी दिली.