कोल्हापुरी बंधार्याला अखेर लागले कठडे, महाराष्ट्र केसरी न्युज च्या बातमीची दखल

  • गेली 4 ते 5 वर्षे पासून कठडे वीणा नागरिकांचा धोकादायक प्रवास होता सुरू 

सडक अर्जुनी, दि. 06 जानेवारी : राका ते सौंदळ या मार्गावर असलेल्या चुलबंद नदीच्या कोल्हापुरी बंधाऱ्याचे कठडे गेली चार ते पाच वर्षापासून तुटलेल्या अवस्थेत होते, त्यामुळे या पुलावरून चालणाऱ्या नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत होता, दोन्ही बाजूला खोल असल्यामुळे, येथे भीती होती, या ठिकाणी अनेक अपघात देखील झाले, परंतु स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी या बंधाऱ्याकडे हेतू परस्पर दुर्लक्ष केलं होतं असे चित्र होते.

वारंवार याबाबत महाराष्ट्र केसरी न्यूज ने वृत्त प्रकाशित करून शासनासह लोकप्रतिनिधींना जागे करण्याचं काम केलं अखेर प्रशासनाने याची दखल घेतली आणि डिसेंबर 2024 पासून या कोल्हापुरी बंधाऱ्यावर लोखंडी कठळे लावण्याचे काम सुरू झाले, हे काम जवळपास पूर्णत्वास आल्याचे आता चित्र आहे, अजून हे काम पंधरा दिवस चालेल, मात्र लागलेल्या कठड्यांमुळे, या मार्गाने चालणाऱ्या नागरिकांना आता भीती लागणार नाही.

  • तत्कालीन जिल्हाधिकारी गोंदिया यांनी घेतली दखल.

यापूर्वी या ठिकाणी बांबूचे कठडे लावून वाहन धारकांना अपघात होणार नाही याचा दिलासा देण्याचा प्रयत्न काही लोकांनी येथे केला होता, सिमेंटच्या बोरीमध्ये वाळू भरून त्या वाळूच्या गोणीत बांबू खूपसुन त्या बांबूचे कठळे या ठिकाणी तयार करण्यात आले होते, आणि त्यामुळे अधिकच या ठिकाणी धोका निर्माण झाला होता, मात्र त्याचेही वृत्त सर्वत्र प्रकाशित झाले, जिल्ह्यातील अनेक वृत्तपत्रांनी, डिजिटल मीडियाने, youtube चॅनेलने, सॅटेलाईट चॅनल ने देखील, त्याबाबत वृत्त प्रकाशित केले होते, आणि प्रशासनाला जाग करण्याचं काम केलं होतं, की या ठिकाणी वाहनधारकांना किती त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे त्या बातमीची दखल तत्कालीन जिल्हाधिकारी गोंदिया यांनी घेतली होती.

  • हा शॉर्टकट मार्ग आहे.

या मार्गाने शाळकरी विद्यार्थी, शेतकरी, तसेच शेतकऱ्यांचे जनावरे, यासह मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहन या मार्गाचा वापर करतात, सौंदळ वरून नवेगावबांध ला जाण्यासाठी हा अगदी जवळचा मार्ग मानला जातो, साकोली वरून येणाऱ्या वाहन धारकांना नवेगावबांध ला जायचं असेल तर महामार्गाने कोहमारा वरून जावा लागतो, हा मार्ग खूप लांब होतो, त्यामुळे ज्या वाहन धारकांना हा शॉर्टकट मार्ग माहित आहे, ते या मार्गाचा मोठ्या प्रमाणात वापर करतात.

  • अधिकारी रुबाब झाडू शकत नाही.

त्यामुळे या मार्गाने मोठ्या प्रमाणात अवजड वाहने देखील चालतात, त्यामुळेच हा मार्ग अनेक ठिकाणी फुटलेला आहे, या मार्गची अनेक वेळा बांधकाम विभागाने दुरुस्ती केली असली तरी पाहिजे तशी दुरुस्ती झाली नाही, स्थानिक लोकप्रतिनिधीचं आणि बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्यामुळेच निकृष्ट दर्जाचे काम होतात, पाहिजे तशी कामाची गुणवत्ता दिसून येत नाही, आणि त्यामुळेच केलेले काम काही दिवसातच निकृष्ट दर्जाचे झाल्याचे चित्र समोर येते, काम करणारे हे लोकप्रतिनिधींच्या अगदी जवळचेच ठेकेदार असतात, त्यामुळे अधिकारी देखील यांच्यावर रुबाब झाडू शकत नाही, ही सत्यता आहे.

  • ते लोकसेवक आणि लोकप्रतिनिधी कोण ?

10 लाख रुपयांची निधी या कोल्हापुरी बंधाऱ्याच्या कठड्याचे काम करण्यासाठी मंजूर करण्यात आले आहे, गेली 3 वर्षे पासून येथे कठडे लावण्याचा प्रयत्न संबंधित विभागाकडून सुरू होता मात्र जिल्हा परिषद गोंदिया कडून याला मंजुरी मिळाली नव्हती असे येथील इंजिनीयर चर्चे दरम्यान ठेकेदाराच्या समक्ष सांगत होते, आता या कामाला मंजुरी न देणारे ते लोकसेवक आणि लोकप्रतिनिधी कोण ? असा ही प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

Leave a Comment

और पढ़ें