भुजबळ साहेबांशी जे बोलायचे ते आम्ही बोलू , काही नाराजगी आहे असं समजू नका : खा. प्रफुल पटेल 

गोंदिया, दि. 03 जानेवारी : काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांना सध्या वाय प्लस दर्जाची सुरक्षा मिळत होती, आता मात्र विजय वडेट्टीवार. हे विरोधी पक्षनेते नाही तर त्यांची सुरक्षा काढण्यात येऊ शकते का? यावर प्रफुल पटेल यांनी उत्तर देताना म्हणाले की कुणाची सुरक्षा पदाच्या आधावर निश्चित राहते, मात्र त्या क्षेत्रातील परिस्थितीला पाहून सुद्धा सुरक्षा दिली जाते, आणि पोलीस प्रशासन ते ठरवते, यावर निश्चितच विजय वडेट्टीवार यांची सुरक्षा कायम ठेवण्याबद्दल प्रफुल पटेल यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याचे दिसले, दि. 02 जानेवारी रोजी गोंदिया येथील निवास स्थानी उपस्थित असताना खा. प्रफुल पटेल यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते दरम्यान पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची त्यांनी अचूक उत्तरे दिली.

  • नगरपरिषद, जिल्हापरिषद निवडणुकीत सुद्धा आमची युती राहणार – खा. प्रफुल पटेल

लोकसभा विधानसभा मध्ये आमची महायुती राहिली, आता येणाऱ्या नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत सुद्धा आमची युती टिकवण्याकरता प्रयत्न करू, आम्ही युतीबरोबरच लढणार आहोत, लहान निवडणुकीमध्ये तिन्ही पक्षाची युती करने अवघड होतं, मात्र आम्ही प्रयत्न करू असे वक्तव्य प्रफुल पटेल यांनी केले आहे, आता येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत महायुतीची ही युती टिकणार की नाही हे बघण्यायोग्य ठरणार आहे. 

  • कारण चिंताजनक परिस्थिती त्यांच्या पक्षाचीच आहे, प्रफुल पटेल यांचा विजय वडेट्टीवारांना सल्ला.

विजय वडेट्टीवार यांनी वक्तव्य केले होते की धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेऊन त्यांच्या जागी भुजबळ यांना मंत्रीपद द्यायचा आहे, याशिवाय बीड प्रकरणी अजित पवार गप्प का? असा सवाल सुद्धा विजय वडीटीवार यांनी उपस्थित केला होता, यावर प्रफुल पटेल यांची प्रतिक्रिया घेतली असता प्रफुल पटेल यांनी विजय वडेट्टीवार उलट उत्तर देत तुम्ही तुमच्या पक्ष सांभाळा, इतर दुसरा पक्षामध्ये काय चालले आहे, त्याचे तुम्ही चिंता करू नका, कारण चिंताजनक परिस्थितीत त्यांच्या पक्षाचीच आहे, असे म्हणून प्रफुल पटेल यांनी प्रत्युत्तर देत विजय वडेट्टीवार यांनाच सल्ला देऊन टाकला.

  • भुजबळ साहेबांशी जे बोलायचे ते आम्ही बोलू 

मंत्रीपद न मिळाल्यामुळे भुजबळ यांनी आपली नाराजी प्रसारमाध्यमासमोर कित्येकदा दर्शवली आहे, यावर प्रफुल पटेल यांची प्रतिक्रिया घेतली असता प्रफुल पटेल म्हणाले की भुजबळ साहेब आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहे, त्यांच्याशी जे काही बोलायचं आहे, ते आम्ही बोलू , त्यांची नाराजी आहे असं काही समजू नका असे विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे खा. प्रफुल पटेल यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहेत.

Leave a Comment

और पढ़ें