अर्जुनी/मोर, दिनांक : ३१ जानेवारी २०२३ : तालुक्यातील ग्राम जांभळी/येलोडी येथे नॅशनल आदिवासी पिपल्स फेडरेशन ग्राम शाखा व गावक-यां तर्फे महामानव क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याचे अनावरण व समाज प्रबोधन मेळावा आयोजित करण्यात आला होता. प्रसंगी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार चंद्रिकापूरे यांच्या अध्यक्षतेत पार पडले. यावेळी आमदार चंद्रिकापूरे यांनी महामानव क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या स्मारकाचे पूजन करून त्यांना अभिवादन केले व समाज प्रबोधनात्मक मार्गदर्शन केले. आमदार चंद्रिकापुरे यांनी आपला अध्यक्षीय भाषणात म्हणाले की बिरसा मुंडा हे भूमी आणि आदिवासींचे लोकनायक आहेत ज्यांनी आदिवासी समाजासाठी उल्लेखनीय कार्य केले आहे. बिरसा मुंडा यांच्या लोककथा आदिवासी समाजासाठी प्रेरणादायी आहेत आणि तरुण पिढीसाठी त्या आदर्श आहेत.
आपल्या पूर्वजांचा, इतिहासाचा आणि संस्कृतीचा आपल्याला अभिमान असायला हवा. किंबहुना, आम्हा आदिवासी समुदायांना आमची स्वतःची वेगळी सांस्कृतिक ओळख आहे. जी इतरांना नाही. आपण ते जपले पाहिजे. कोणत्याही प्रकारच्या आधुनिकतेचा आपल्यावर परिणाम होऊ नये.
वीर बिरसा मुंडा केवळ २५ वर्षे जगले, पण त्यांनी आदिवासी समाजाला ब्रिटीशांच्या विरोधात एकत्रित केले. आणि आदिवासींच्या जमिनीच्या हक्कांचे संरक्षण करणारे कायदे अंमलात आणण्यासाठी वसाहती अधिकाऱ्यांना भाग पाडले.
कार्यक्रमा प्रसंगी सहेसराम कोरेटे आमदार आमगाव देवरी विधानसभा, यशवंत गणविर जि.प. उपाध्यक्ष, अनिल दहिवले महा. प्रदेश काँग्रेस कमेटी, श्रीमती चंद्रकलाबाई ठवरे प.स. सदस्या, वाढवे सर येरंडी, रतिराम राणे माजी जि.प. सदस्य, गणेश ताराम सरपंच गट ग्रा.पं. रामपूरी आदिंसह नॅशनल आदिवासी पिपल्स फेडरेशन शाखेचे कार्यकारीणी तेसेच गावातील प्रतिष्ठित मान्यवर व गावातील नागरिक उपस्थित होते.