महिलांना सक्षमीकरणासाठी पुढे येणाची गरज आहे : प्रा. मंजुताई चंद्रिकापूरे


सडक अर्जुनी, दिनांक : ३१ जानेवारी २०२३ : हिरकणी प्रभाग संघ व संकल्प ग्रामसंघ यांच्या सहकार्याने चिखली येथे महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. महिलांना शासनाच्या महिला सक्षमीकरणासाठी विविध योजनांचा लाभ घ्यावा. त्यांना घरात फक्त चुल व मुल करिता न राहता आपल्या सक्षमीकरणाचे धडे गिरवणे सुध्दा महत्वाचे आहे. त्यासाठी महिलांनी सामोरे जाणे गरजेचे आहे. महिलांनी बचत गटांच्या माध्यमाने विविध लघुउद्योग उभारता येतात. आता उमेद व माविम या योजनांच्या माध्यमाने गावात बचत गटांमार्फत कृषी सखी व पशु सखी हे नियोजीत करून महिलांचे सक्षमीकरणात भर घातली आहे.

असे प्रा. मंजुताई चंद्रिकापूरे यांनी महिलांना मार्गदर्शन केल. त्यावेळी उपस्थित महिलांना हळदी कुंकू लावुन विविध भेटवस्तू देण्यात आल्या.
यावेळी कविता रंगारी जि. प. सदस्या, पुजा दिक्षित, चित्रा भेंडारकर, शितल मेश्राम ग्रा.पं. सदस्य, रमा कोरे, हर्षा राऊत, थोटे माजी सरपंच कोहमारा, राधिका धनकाटे, राऊत शिक्षिका, कांता नागोसे व हिरकणी प्रभागसंघ व संकल्प ग्रामसंघ चे सर्व कार्यकारीणी व गाव परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


 

Leave a Comment