अवैध मुरूम वाहतूक करणाऱ्या वाहनाची माहिती देण्यास महसूल विभागाची टाळाटाळ


सडक अर्जुनी, दिंनाक : 01 फेब्रुवारी 2023 : तहसीलदारांच्या पथकाने अवैध मुरूम वाहतूक करणाऱ्या एका ट्रॅक वर जप्तीची कारवाई नुकतीच केली आहे. हा ट्रॅक कुणाचा आहे. किंवा यावर काय कारवाई झाली. याबाबतची माहिती मागणीसाठी आम्ही तहसील कार्यालयात गेलो असता कार्यालयातील कर्मचारी माहिती देण्यास टाळटाळ करीत असल्याचे लक्ष्यात आले. त्याच वेळी तहसीलदार यांना भ्रमण ध्वनि वरून संपर्क केला असता त्यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही. तर उपविभागीय अधिकारी आणि नायब तहसीलदार यांच्याशी संपर्क केला असता ते प्रकुर्ती बरी नश्ल्याने सुट्टीवर आहेत असे सांगितले.

तब्बल एक तास माहिती मागण्यासाठी या टेबलावरून त्या टेबलावर कर्मचार्यांनी पाठविले मात्र अखेर माहिती दिली नाही. शेवटी पत्र लाऊन माहिती घ्यावी अशी कर्मचाऱ्यांनी सांगितले. मात्र कार्यवाई झाल्यानंतर स्वत अधिकार्यांनी पत्रकारांना त्याची माहिती प्रेस नोट च्या माध्यमातून दिले पाहिजे मात्र असे न करत उलट माहिती लपविली जात आहे. आता सांगायचं म्हणजे ग्राम पंचायत निवडणुकी काळात काही सरपंचांनी भरलेल्या नाम निर्देशन पात्रांची माहिती दिनांक : १४ डिसेंबर २०२२ रोजी पत्र लाऊन मागितली होती. मात्र अद्यापही अर्जदाराला माहिती मिळाली नाही. त्यामुळे सरकारी काम आणि सहा महिने थांब अशी म्हण अगदी सहज रित्या बसते. यावरून असे लक्ष्यात येते की तालुक्यात होत असलेल्या अवैध उत्खननाला अधिकाऱ्यांची मुख समती आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितनुसार ज्या दिवशी तहसीलदारांच्या पथकाने एका वाहनावर जप्तीची कारवाई केली त्या ठिकाणी तब्बल 7 ट्रॅक सोडून देण्यात आले.

खरतर या वाहनावरही कारवाई होणार नव्हती असे सांगितले जाते. मात्र तालुक्यातील पत्रकारांच्या सिस्ठ मंडळाने भेट दिल्यामुळे ती कार्यवाई करण्यात आली. तालुक्यातील काही पत्रकारांचे देखील यात हात अश्ल्याचे समोर आले आहे. तालुक्यात आजच्या तारखेला मुरूम उत्खनन करण्यास परवानगी नाही. मात्र महामार्गाच्या कामावर आणि पेट्रोल पंप च्या कामावर हजारो ट्रीप मुरूम टाकण्यात आला आहे. नदीपात्रातून वीणा परवाना वाळूचे उत्खनन देखील जोमात होत आहे. कारवाई मात्र सून्य आहे. तालुक्यात प्रशासनाची नाचक्की झाल्याचे चित्र आहे. खुले आम अवैध उत्खनन जोमात चालू आहे. यावर जिल्हाधिकार्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.


 

Leave a Comment