बडोलेच्यां हस्ते सौंदड येथे वर्गखोलीच्या बांधकामाचे भूमिपूजन संपन्न.


सडक अर्जुनी, दिंनाक : 07 फेब्रुवारी 2023 : जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महा विद्यालय सौंदड येथे समग्र शिक्षा अभियान अंतर्गत 17. 34 लक्ष रुपयाच्या निधीतून वर्गखोलीच्या बांधकामाचे भूमिपूजन आज 07 फेब्रुवारी ला संपन्न झाले. तसेच माता रमाई यांच्या जयंतनिमित्त त्यांच्या तेल चित्राचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

यावेळी अध्यक्ष स्थानी मंचावर माजी मंत्री राजकुमार बडोले उपस्थित होते. त्यांनी मंचावरून आपले मत वेक्त केले. ते म्हणाले भीमराव होते दिव्याच्या समान आणि रमाई होती दिव्याची वात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एका समाजासाठी नव्हते तर ते संपूर्ण देशासाठी होते. बाबासाहेब आम्हा सर्वांना कळले नाही ते आमचे दुर्दैव आहे.

त्या काळात लोक पाणी सुधा देत नव्हते. तरी बाबासाहेब उच शिक्षित झाले. आणि माता रमाई या अशिक्षित होत्या. महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे देखील असेच जीवन होते. त्यांनी आपले जीवन लोकांसाठी अर्पण केलं. ही अशी समर्पणाची भावनी असायला पाहिजे असे मत त्यांनी मंचावरून वेक्त केले.

यावेळी मंचावर जिल्हा परिषद सदस्य निशा तोडासे, पंचायत समिती सदस्य वर्षा शाहारे, सरपंच हर्ष मोदी, भावराव यावलकर उप सरपंच, ग्राम पंचायत सदस्य सुभम जनबंधू , ग्रा.प. सदस्य रंजू भोई, ग्रा. प. सदस्य सुषमा राऊत, ग्रा. प. सदस्य अर्चना चन्ने, ग्रा. प. सदस्य प्रमिला निर्वाण, ग्रा. प. सदस्य विजय चोपकर, व्यापारी आघडी चे अध्यक्ष संदीप मोदी, मुख्याध्यापक सुनील भिमटे, सहाय्यक शिक्षक अनिल बोरकर, सहाय्यक शिक्षक अनिल कापगते, सहाय्यक शिक्षक दमयंती तुरकर, पुरुषोत्तम निंबेकर, आशिष राऊत, ऋषभ राऊत सह गावातील अन्य नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन जयपाल मोटघरे सहाय्यक शिक्षक यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार लोकेश रहांगडाले सहाय्यक शिक्षक यांनी मानले.


 

Leave a Comment