त्या आमदाराच्या माजी पीए ने आमदाराच्या व्हॉट्स ॲप ग्रुप वर केला कब्जा, अनेकांना काढले बाहेर!

विधान सभा निवडणुकीच्या तोंडावर अर्जुनी मोरगाव विधान सभा क्षेत्रात विविध चर्चेला उधाण?

सडक अर्जुनी, ( बबलु मारवाडे ) दि. 30 जुन 2024 : अर्जुनी मोरगाव विधान सभा क्षेत्रात निवडणुकीच्या तोंडावर अनेक प्रकार घडताना आपल्याला दिसत आहेत. ज्या आमदाराकडे पीए म्हणून काम करीत होता त्याने चक्क आमदाराच्या दोन्ही मुलाला, जावायाला, ठेकेदाराला आणि अन्य एकाला अश्या एकूण 5 लोकांना व्हॉट्स ॲप ग्रुप मधून बाहेर काढले आहे. हा ग्रुप MLA media group म्हणून तब्बल 4 वर्षे पासून सुरू होता. या ग्रुप मध्ये अर्जुनी मोरगाव विधान सभा क्षेत्रा सह गोंदिया येथील काही पत्रकार ग्रुप सदस्य म्हणून आहेत.


आमदार मोहोदयांनी केलेल्या विकास कामांची माहिती पत्रकारांना वेळोवेळी पुरविण्यासाठी या व्हॉट्स ॲप ग्रुप ची निर्मिती दि. 04, 21, 2021 रोजी आशिष येरणे यांनी केली होती, तर या ग्रुप चे अनेक admin होते, येरने हे राष्ट्रवादी पक्षात कार्यकर्ते म्हणून काम करीत होते, तर ते आमदार महोदयांच्या अत्यंत जवळचे होते, मात्र राष्ट्रवादी गटाचे दोन भाग झाल्यानंतर अजित पवार गटाला सोडून अनेकांनी शरद पवार गटाकडे धाव घेतली यात यांचाही समावेश होता, या प्रसंगाला 1 वर्षाचा कालावधी लोटला मात्र आता विधान सभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक प्रकार घडताना दिसत आहेत.


आमदार महोदयांच्या ग्रुप मधून त्यांच्या दोन्ही मुलांसह सह एकूण 5 लोकांना बाहेर काढल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे. मिथुन मेश्राम असे त्या माजी पीए चे नाव आहे. तर मनोहर चंद्रिकापुरे असे अर्जुनी मोरगाव विधान सभा क्षेत्राचे आमदार यांचे नाव आहे. ते 2019 मध्ये अर्जुनी मोरगाव विधान सभा क्षेत्राचे आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांनी माजी मंत्री राजकुमार बडोले यांचा अंदाजे 717 मतांनी पराभव केला होता. दोन वेळा आमदार असलेले माजी मंत्री अगदी कमी मताधिक्याने पराभूत झाले होते.

2014 मध्ये आमदार मनोहर चंद्रिकापुरे निवडणुकीत उभे झाले होते. मात्र त्यांना यश आले नाही. त्या नंतर त्यांनी तब्बल 5 वर्षे जनतेत राहून काम केले आणि त्याचीच पावती म्हणून जनतेने त्यांना 2019 मध्ये निवडून दिले. 2019 पूर्वी पासून मिथुन मेश्राम हा आमदार महोदयांचा पीए म्हणून काम करीत होता. मात्र आमदार मोहद्यांच्या पदाचा गैर फायदा घेत अनेक गैर काम केल्या मुळे आमदार मोहदयानी त्याला कामावरून काढले होते असे आमदार मोहद्यांचे पुत्र सुगत चंद्रिकापुरे यांनी सावंगी येथील बल हॉटेल मध्ये एका भेटी दरम्यान पत्रकारांशी बोलताना सांगितले होते.

मिथुन मेश्राम हा आता राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार गटामध्ये गेली 1 वर्ष पासून काम करीत आहे. 2024 च्या आगामी निवडणुकी मध्ये पक्षाने आपल्याला तिकीट दिली तर आपण आमदारकी लडणार असे मेश्राम यांनी पत्रकारांशी बोलताना एका भेटी दरम्यान सांगितले होते.

मिथुन मेश्राम सह अन्य कार्यकर्ते आंदोलन करताना. ( संग्रहित छायाचित्र  )

मेश्राम यांनी लोकसभेच्या काळात तत्कालीन खासदार सुनील मेंढे यांच्यावर अनेक टीका केली होती. तर आमदार मनोहर चंद्रिकापुरे, माजी मंत्री राजकुमार बडोले यांच्यावर देखील टीका केली होती, त्यांनी अर्जुनी मोर विधान सभा क्षेत्राचा विकास केला नाही असे त्यांचे मत होते. आमदारांच्या ग्रुप मधून त्यांच्या मुलांना बाहेर काढल्या मुळे काय प्रकार घडला हे जाणून घेण्यासाठी आम्ही मिथुन मेश्राम जिल्हा कार्यअध्यक्ष शरद पवार गट यांना भ्रमण ध्वनी वरून संपर्क केला असता त्यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही. सदर व्हॉट्स ॲप ग्रुप आता मेश्राम यांच्या ताब्यात आहे. त्यांनी सदर ग्रुपला आपली डीपी लावली आहे. तर त्यांनी अनेक पोस्ट देखील सदर ग्रुप मध्ये टाकल्या आहेत.

सुगत चंद्रिकापुरे, कार्यकर्ता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सदर सिमकार्ड ही आमच्या कर्मचाऱ्याच्या नावाने होती मिथुन मेश्राम असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडे सोशल मीडिया चे ही काम होते. त्याला आम्ही कामावरून काढून दिले होते, आम्हाला वाटलं की ती सिम कार्ड आमच्या नावाने आहे. हा प्रकार झाल्यानंतर, त्याला याबाबत विचारणा केली असता. त्याचे म्हणणे आहे की सदर सिम कार्ड कोण ऑपरेट करते ते मला माहित नाही. एकंदरीत सदर सिमकार्ड हॅक झाली की काय असा संभ्रम आहे. पोलिसांकडे देखील याबाबत आम्ही तक्रार केली आहे. 

 

Leave a Comment

और पढ़ें