प्रशासनाच्या दिरंगाईमुळे अनेक विकासकाम रखडलेले आमदार विनोद अग्रवालांनी प्रशासनावर केली नाराजी व्यक्त

प्रतिनिधी/गोंदिया, दी. २५ जून : गोंदियातील अनेक समस्यांचा निराकरणासाठी आमदार विनोद अग्रवाल यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी यांच्या दालन्यात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात जुनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे आवार हस्तान्तरण, बिरसी विमानतळ-प्रकल्पग्रस्त नागरिकांना मुलभुत सुविधा पुरविणे तथा इतर समस्या, कामठा -परसवाड़ा रोड, परसवाडा कामठा क्षेत्रातील विद्यार्थ्याकरीता बसेसची व्यवस्था, काटी – कासा रोड चे प्रश्न मार्गी लावण्याबाबत, अन्न नागरी पुरवठा अंतर्गत इष्टांग वाढविने, गोंदिया सिटी सर्वे, जलजीवन मिशन अंतर्गत कामाबाबत आढावा बैठक घेण्यात आली. त्यात आमदार विनोद अग्रवाल यांनी नाराजी जाहिर करत अधिकारी व कर्मचा-यांना खड़सावले. नागरिकांना सोयीनुसार जे कामे नियोजित करण्यात आले होते ते अद्यापही मार्गी न लागल्याने अधिका-यांवर संतापले.

सध्या स्थितीत पावसाळाचे दिवस शुरू झाले असुन ही विजेचे काम प्रलंबित आहे. परसवाडा- कामठा रास्ता बंद झाला असून पर्यायी व्यवस्था करण्यात आली नाही तसेच पिण्याचे पाणी, शाळा, पुनर्वसन सारखे बरेच विषय मागील अनेक वर्षापासून प्रलंबित असून त्यावर तोडगा काढण्याची कार्यवाही करण्यात आली नाही. बस स्टॉप, स्ट्रीट लाईट, असे ब-याच विषयावर १५ दिवसाच्या आत पूर्ण करण्याची कार्यवाही करण्याचे आदेश काढण्यात यांवे असे निर्देश देण्यात आहे. शाळेतील विद्यार्थ्यांकरीता बसेची सुविधा, तसेच प्राधान्य कुटुंब योजने अंतर्गत लाभार्थ्यांची संख्या मध्ये वाढ करण्यात यांवे, काटी- कासा गावातील पुरजन्य परिस्थिती मध्ये संपर्क तुटण्याची समस्यांवर उपाययोजना करण्याची सुचनाही आमदार विनोद अग्रवाल यांनी संबधितांना दिली.

गोंदियाचे सिटी सर्वेबाबत ही या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. सिटी सर्व्हे बाबत निधी उपलब्ध करून दिली असून आवश्यक सर्व परवानग्या सुद्धा उपलब्ध करून दिल्या असूनही कामात उशीर होत असल्याने संबंधित अधिकाऱ्यांना कामात गती आणण्याबाबत सूचना केल्या. यासह जलजीवन मिशन महाराष्ट्र जल प्राधिकरण अंतर्गत शुरू असलेले कामे अर्धवट असून अनेक गावात रस्त्यांचे खोदकाम करण्यात आल्याने नागरिकांना त्रास सहन करावे लागत आहे. ते कामे लवकर पूर्ण करण्यात यांवे असेही आमदार विनोद अग्रवाल यांनी संबधितांना सुचना दिली व तातडीने सर्व प्रश्न मार्गी लावण्यात यांवे असेही निर्देश दिले.

एअरपोर्ट अथॉरिटी ला पडला आश्वासनांचा विसर

बिरसी एअरपोर्ट बांधकामा संबंधी आवश्यक त्या परवानग्या व पुनर्वसनासंबंधी केलेले आश्वासनांचा एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियांना विसर पडला असून पुनर्वसित क्षेत्रात आणि नागरिकांना पुरवल्या जाणाऱ्या आवश्यक 23 सुविधांपैकी अद्याप एकही सुविधा बाबत एअरपोर्ट ऑथॉरिटी च्या माध्यमातून कोणतेही कार्यवाही केली गेली नसल्याने आमदार विनोद अग्रवाल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले. पुनर्वसन क्षेत्रात नागरिकांना इजा करण्यासाठी पक्के रस्ते वीज पुरवठा पाणीपुरवठा विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची सुविधा असे एकूण 23 मूलभूत सुविधा पुरवण्याची जबाबदारी एअरपोर्ट ऑथॉरिटी ची होती परंतु आज अनेक वर्ष लुटूनही पुनर्वास क्षेत्रात कोणत्याही मूलभूत सुविधांची पूर्तता झाली नसल्याने आमदार विनोद अग्रवाल संबंधित अधिकाऱ्यांवर चांगले संतापले होते. त्यावर जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ किमान मूलभूत सुविधा पुरवण्याच्या सूचना करण्यात आल्या.

दरम्यान बैठक मध्ये प्रामुख्याने विधायक विनोद अग्रवाल, जिलाधिकारी प्रजीत नायर, मुख्य कार्यकारी अधिकारी जिप.गोंदिया मुरुंगनाथन, उपजिलाधिकारी विजया बनकर, कृषि उत्पन्न बाजार समिति के सभापती भाउराव उके, पंचायत समिती के सभापती मुनेश रहांगडाले, उपविभागीय अधिकारी पर्वणी पाटील, तहसीलदार विशाल सोनवने, मुख्याधिकारी नगर परिषद, गोंदिया बल्लाड, जिला पुरवठा अधिकारी वानखेड़े, तालुका भूमि अभिलेख बोकडे, नायब तहसीलदार पालांदूरकर, पीएमजेएसवाय कार्यकारी अभियंता आवडे, एमजेपी कार्यकारी अभियंता गणवीर, सार्वजानिक बांधकाम विभाग क्र.१ कार्यकारी अभियंता लभाने, सार्वजानिक बांधकाम विभाग जिप गोंदिया अभियंता मेश्राम, उपविभागीय अभियंता लांजेवार, उपविभागीय अभियंता हटवार, जिला आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे, कार्यकारी अभियंता विद्युत विभाग आनंद जैन, कार्यकारी अभियंता समग्र शिक्षा जिवनेश मिश्रा, श्री सोनारकर, इत्यादी पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Comment

और पढ़ें