गोंदिया जिल्ह्यात दमदार पावसाची हजेरी, भाताच्या पऱ्यांना होणार मोठा फायदा.

गोंदिया, दी. २७ जून : जिल्ह्यामध्ये दमदार पावसाची हजेरी झाल्याने या पावसाचा फायदा शेतकऱ्यांच्या भात पिकाच्या पर्‍याला होणार आहे, आज दी. २७ जून रोजी आलेले पाऊस जिल्ह्यातील काही भागातच आल्याचे चित्र आहे. गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातील हे चित्र आहे. आज झालेल्या पावसाने सडक अर्जूनी तालुक्यामध्ये दमदार हजेरी लावल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. खरीप हंगामातील भात पिकाची पेरणी त्याच बरोबर तुरीच्या पिकाची पेरणी देखील शेतकऱ्यांनी बांधावर केली होती.

शेतकरी राज्याला वाटलं की पाऊस येईल परंतु पावसाने एक दोनदा हजेरी लावत दडी मारली होती, काही शेतकऱ्यांनी लावलेल्या भात पिकाला कोंब आले परंतु पावसाने दांडी मारल्यामुळे भात पिकाचे परे पुन्हा करपल्याचे चित्र आहे.
मात्र आज आलेल्या पावसाने शेतकऱ्यांनी पेरलेल्या तुर पिकाला तसेच भात पिकाला मोठा फायदा होणार आहे.

ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची सोय उपलब्ध आहे. अशा शेतकऱ्यांनी पावसाची प्रतीक्षा न करता भात पिकांच्या पऱ्यांची लागण केली होती. परंतु ज्यांच्याकडे पाण्याची सोय नाही. अशा शेतकऱ्यांनी पावसाच्या पाण्याचा आधार घेत परे लावायला सुरुवात केली होती. तसेच काही शेतकऱ्यांनी शेतामध्ये कोरडे परे पेरले होते. पाणी येईल तर भात पिकाला अंकुर येतील अशा आशे मध्ये शेतकरी होते, मात्र पावसाने दांडी मारल्यामुळे पेरलेले धान्य पक्ष्यांनी खाऊन टाकले आता अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे. तर आज आलेल्या पावसामुळे जमिनी मध्ये असलेल्या दाण्याला कोंब येणार तसेच ज्या ज्या शेतकऱ्यांचे परे कोमेजले होते अशांना आज आलेल्या पावसाचा मोठा फायदा होणार आहे.

Leave a Comment

और पढ़ें