पिंपळाच्या झाडाचा खांदा विद्युत तारांसह घरावर पडले, घर मालकाचे झाले नुकसान.
गोंदिया, दी. २७ जून : जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुका अंतर्गत येत असलेले ग्राम कोहमारा येथे मुख्य बस स्थानक वर असलेले पिंपळाचे झाड हे गेले अनेक वर्षे पासून या ठिकाणी आहे. परंतु स्थानिक प्रशासनाने पावसाळा येण्यापूर्वी सदर झाडाचे खांदे छाटले नसल्यामुळे आज आलेल्या पावसासह वाऱ्यावरदानाने पिंपळाच्या झाडाचा खांदा गावात वीज वाहून नेणाऱ्या विद्युत तारांवर पडला त्यामुळे कोहमारा गावातील संपूर्ण विद्युत बंद झाली आहे.
विशेष म्हणजे सदर ठिकाणी बस स्थानक असल्यामुळे नेहमीच मोठ्या प्रमाणात नागरिक उभे असतात. झाडाचे फांदे जर खाली पडले असते तर यामुळे एखाद्याचे जीव गेले असते याला जबाबदार कोण असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
स्थानिक रहिवासी विनायक परसोडकर यांच्या घरावर सदर झाडाचा खांदा पडल्याने घराच्या बाजूला असलेला पत्रांचा शेड संपूर्ण बेंड झाल्याचे चित्र आहे. विनायक परसोडकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की स्थानिक विद्युत विभागाला याबाबत माहिती दिली होती. तसेच स्थानिक आमदारांना सुद्धा याबाबत माहिती दिली होती. परंतु त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने हे दृश्य निर्माण झाले आहे. याला जबाबदार संबंधित यंत्रणा असल्याचा आरोप त्यांनी पत्रकारांशी बोलताना केला आहे. तसेच विद्युत विभागाचे अधिकारी के. मदन नायडू यांच्यावर कडक कारवाई करण्याची देखील त्यांनी मागणी केली आहे.