महाराष्ट्र केसरी न्युज च्या बातमीचा दणका; अखेर अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या दोन वाहनावर पोलिसांनी केली कारवाई! 

  • महसूल विभाग मात्र आजही बग्याच्या भूमिकेत, कोट्यावधी रुपयांची वाळू चोरीला

सडक अर्जुनी, ( बबलु मारवाडे ) दी. 28 डिसेंबर : डूगगीपार पोलिस स्टेशन च्या हद्दीत असलेल्या चुलबंद नदी व नाल्यातून मोठ्या प्रमाणावर अवैध गौण खनिज वाहतूक केले जाते, यावर महसूल विभागाचे हेतु परस्पर दुर्लक्ष होत असल्या मुळे रेतीची अवैध वाहतूक सुरू असते, त्या मुळे शासनाला रोज लाखो रुपयांचा चुना लागतो.

या बाबद महाराष्ट्र केसरी न्युज व रूद्रसागर न्युज पेपर ने “पिंपरी, सौंदड, पळसगाव नदी पात्रातून अवैध वाळू उपसा सुरूच, कारवाई थंड बसत्यात?” या शिर्षका खाली दींनाक : 22 डिसेंबर रोजी एक वृत्त प्रकाशित केले त्या वृताची दखल पोलिस विभागाने घेतली असून दोन अवैध रित्या वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावर 27 डिसेंबर रोजी कारवाई केली यात तब्बल 6 लाख 22 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 4 आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई सौंदड पिपरी रेती घाटावर दिनांक 27 डिसेंबर रोजी सकाळी 09 वाजता दरम्यान करण्यात आली आहे. 

यात वाहन चालक आरोपी नामे 1) ज्ञानेश्वर दिलीप नेवारे वय 29 वर्षे, व वाहन मालक नामे 2) राजेंद्र हरिश्चंद्र भेंडारकर वय 45 वर्षे यांचे ट्रॅक्टर क्र. एम. एच. 35 ए.जी. 8513 मध्ये एक ब्रास वाळू मिळून आली त्याची एकूण किंमत 3 लाख 10 हजार रुपये व एक ब्रास वाळूची किंमत 6 हजार रुपये.

तसेच दुसरे वाहनातील आरोपी चालक नामे 3) दामोधर चैतराम निर्वाण वय 36 वर्षे व मालक नामे 4) अमोल अशोक मेंढे वय 29 वर्षे सर्व राहणार सौंदड यांचा विना क्रमांकाचा ट्रॅक्टर किंमत 3 लाख व एक ब्रास रेती किंमत 6 हजार रुपये असा एकुण 6 लाख 22 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपी विरुद्ध कलम 303 (2), 49 भारतीय न्याय संहीता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर ची कारवाई ठाणेदार मंगेश काळे पो.स्टे. डुग्गीपार, सफौ. विलास निर्वाण, पोना महेंद्र सोनवाने, रविंद्र रामटेके, संजीव चकोले, पोशि सुनील डहाके, शैलेश झाडे यांनी केली आहे. वृत्त प्रसिध्दी झाल्यानंतर पोलिसांनी माहिती दिली की, सदर वाहन मा. न्यायालयाच्या आदेशानुसार सोडण्यात येतील अशी माहिती पोलिसांनी दिली आहे, तर दोन्ही वाहन पोलिस स्थानकाच्या आवारात उभी आहेत. 

 

Leave a Comment

और पढ़ें