शरद पवार माझे दैवत मी पवार कुटूंबीयांचा एक सदस्य, आम्ही एकत्र आलो तर खूप चांगले होईल : खा. प्रफुल पटेल

गोंदिया, दीं. 01 जानेवारी 2025 : उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्या आईने शरद पवार आणि अजित पवार हे सोबत आल्या पाहिजे अशी इच्छा त्यांनी आज व्यक्त केली होती यावर राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे नेते खा. प्रफुल पटेल याना पत्रकारांनी गोंदियात विचारणा केली असता शरद पवार हे माझे दैवत आहेत आणि मी स्वतःला पवार कुटंबीयांचा सदस्य समजतो त्यामुळे मी आणि अजित पवार स्वतः शरद पवार साहेबांच्या वाढदिवसाला दिल्लीला गेलो होतो, आम्ही राजकीय मार्ग जरी वेगळा केले असलो तरी पवार साहेबानंप्रति आम्हाला नेहमी आदर आहे, आणि जर एकत्र आले किंवा पवार कुटूंब एकत्र आले तरी आम्हाला आनंद होईल पवार साहेबांचा सन्मान कमी होणार नाही, मात्र उद्या भविष्य वाणी काय होईल हे मी सांगू शकत नाही, पवार साहेब आमचे पितृतुल्य आहेत, त्यांच्या सोबत आम्हला चांगले संबध ठेवायचे आहे, असे खा. प्रफुल पटेल म्हणाले.

  • भविष्य हे देवाच्या हातात असते – खा. प्रफुल पटेल 

देशातील प्रसिद्ध जोतिषाचार्य डॉ पवन सिन्हा गुरुजी यांनी नवीन वर्षात पंत प्रधान नरेंद्र मोदी हे पंतप्रधान पदावर राहणार नाही. मात्र त्यांच्या हातीच कमांड असेल अशी भविष्यवाणी त्यांनी गोंदियात आयोजित राजयोग शिबिरा दरम्यान आले असताना केली होती, या संदर्भात खा. प्रफुल पेटलं हे आज 01 जानेवारी रोजी गोंदिया जिल्याच्या दवऱ्यावर आले असताना त्याना विचारले असता खा. प्रफुल पटेल म्हणाले कि भविष्य हे देवाच्या हातात असते ते कुणाला काही सांगत नाही, जेव्हा होते तेव्हा दिसून पडते, गावा गावात जोतिषचार्य आहेत, त्यामुळे मी त्यांच्या बदल अधिक काही बोलणार नसल्याचे खा. पटेल म्हणाले.

  • मंत्री होण्याचा योग्य अजून माझा आला नाही – खा. प्रफुल पटेल 

तर राज्यात नुकतीच नवीन सरकार स्थापित झाली असून अजून पालक मंत्री पदाचे वाटप करण्यात आले नाही, या संदर्भात खा. प्रफुल पटेलांना विचारणा केली असता, प्रफुल पटेल म्हणाले येत्या दोन चार दिवसात मार्ग निघणार आहे, काळजी करू नका सर्व ऑल इज़ वैल होणार आहे, तर केंद्रात देखील राष्ट्रवादी काँग्रेसची साथ असल्याने खा. प्रफुल पटेल हे मंत्री होतील अशी इच्छा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची आहे, या संदभार्त प्रफुल पटेल यांना विचारले असता मंत्री होण्याचा योग्य अजून माझा आला नाही, आली कि नक्की होऊ मोदींच्या नेतृत्वात चांगले सरकार केंद्रात असल्याचे खा प्रफुल पटेल म्हणाले.

Leave a Comment

और पढ़ें