गोंदिया, दि. 03 जानेवारी : राज्यात 36 वे राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान सुरू झाले असून 2025 निमित्ताने उदघाटन दिं 01 जानेवारी रोजी राजेंद्र केसकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी गोंदिया यांच्या अध्यक्षतेखाली कार्यालयात पार पडले.
सदर कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून नागेश भास्कर, पोलिस निरीक्षक (जिल्हा वाहतूक शाखा गोंदिया) हे उपस्थित होते, तर ओमप्रकाश सय्याम, मोटर वाहन निरक्षक यांनी राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियांतर्गत घेण्यात येणारे विविध उपक्रमाबद्दल सर्वांना अवगत केले.
राजेंद्र केसकर, उपप्रादेशिक परिवन अधिकारी यांनी लोकांना टू व्हीलर चालवताना हेल्मेट व फोर व्हीलर चालविताना सीट बेल्ट च्या वापराबाबत आव्हाहन केले, तसेच सदर कार्यक्रमाचे सूत्र संचालन अमीत रौंदळ, प्रस्तावना पंकज आनंदपुरे व समारोप प्रसाद सुर्वासे यांनी केला.
Author: Maharashtra Kesari News
Post Views: 125