गोरेगाव, दि. 03 जानेवारी : गोंदिया जिल्याच्या गोरेगाव तालुक्या अंतर्गत येणाऱ्या साईटोला गावातील जिल्हा परिषद शाळेतील छताचे प्लास्टर मुलांच्या आंगावर कोसळल्याने तीन विद्यार्थी जखमी झाल्याची घटना 02 जानेवारी रोजी उघडकीस आली आहे.
या घटनेत तिसऱ्यां वर्गात शिकणारा लखन राहागडाले हा गंभीर जखमी झाला. तर पहिल्या वर्गात शिकत असेलेला दीपराज सोनवने आणि क्रिस बिसेन हा किरकोळ जखमी झाला असून त्याच्यावर प्रथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरु आहे.
विशेष बाब म्हणजे या शाळेत वर्ग 1 ते 4 पर्यत शिक्षण दिले जात असून हे सर्व विद्यार्थी एकाच खोलीत बसून शिक्षण घेतात दुपारी 3 वाजे दरम्यान हे तिन्ही विद्यार्थी शिक्षकांकडे गणवेष मागण्यासाठी गेले असताना ही घटना घडली असून जो पर्यत जिल्हा परिषद याकडे लक्ष देत नाही तो पर्यत आपल्या मुलांना शाळेत पाठविणार नसल्याची भूमिका पालकांनी घेतली आहे.