ई- पिक नोंदणीत झालेली चुक दुरुस्त करा, जिल्हाधिकार्यांना दिले निवेदन

सडक अर्जुनी, दि. 03 जानेवारी : सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम मुरपार ( लेंडेझरी ) व सडक अर्जुनी येथिल धान उत्पादक शेतक-यांच्या 7/12 मध्ये ई- पिक नोंदणीत झालेली चुक दुरुस्त करण्याबाचत चे लेखी निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सडक अर्जुनी तालुका अध्यक्ष अविनाश काशीवार यांनी दि. 31 डिसेंबर 2024 रोजी जिल्हाधिकारी यांना भेटून दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की : खरीप हंगामामध्ये ग्राम मुरपार व सडक अर्जुनी तालुक्यातील काही गावांमध्ये 7/12 मध्ये ई पिक नोंदणीमध्ये धान ऐवजी इतर पिके दाखविण्यात आले.

त्यामुळे शासकीय आधारभुत धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांना धान विकता येत नाही, तसेच शासनाने जाहीर केलेले प्रोत्साहन पर राशी (बोनस) या लाभापासुन ई पिक नोंदणीत झालेल्या चुकीमुळे शेतकरीत वंचित राहतील तरी सदर चुक दुरुस्त् करुन धान पिकाची नोंदणी शेतकऱ्यांच्या 7/12 वर करण्यात यावी.

जनेकरुन त्यांना शासनाने जाहीर केलेले प्रोत्साहन पर राशी (बोनस) चा लाभ घेता येईल व शासकीय आधारभुत धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांना धान विकता येईल असे निवेदनात म्हटले आहे, यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सडक अर्जुनी तालुका अध्यक्ष अविनाश काशीवार, महिला तालुका अध्यक्ष रजनी ताई गिऱ्हेपुंजे, कृष्णा कोरे, कुशन काशिवार, गोमा मुंगमोडे सह कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Comment

और पढ़ें