लोहिया विद्यालयात स्नेहसंमेलनाचे उद्घाटन संपन्न.

सौंदड, दी. २९ डिसेंबर : लोहिया शिक्षण संस्था द्वारा संचालित रामेश्वरदास जमनादास लोहिया माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय, रामदेवबाबा अध्यापक विद्यालय व जमुनादेवी लोहिया प्राथ. शाळा सौंदड यांच्या संयुक्त स्नेहसंमेलनाचे उद्घाटन व राजकुमार बडोले आमदार अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्र यांच्या शुभहस्ते आज दिनांक २९ डिसेंबर २०२४ रोज रविवारला पार पडले.

यावेळी भगवान गणेश, भारत माता, सरस्वती माता तसेच स्वर्गीय रामेश्वरदासजी लोहिया स्वर्गीय जमुनादेवी लोहिया यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. स्नेहसंमेलनाचे दीप प्रज्वलन करण्यात आले. तसेच स्व. रामेश्वरदास जमनादास लोहिया पुण्यतिथी निमित्त श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनील फुंडे अध्यक्ष भंडारा जिल्हा मध्य. सह .बँक मर्या .भंडारा, प्रमुख अतिथी जगदीश लोहिया संस्थापक संस्थाध्यक्ष, लोहिया शिक्षण संस्था सौंदड, प्रभूदयाल लोहिया, माजी जि. प. सदस्य भंडारा, सुरेशकुमार लोहिया कोषाध्यक्ष लो.शि. संस्था सौंदड, हर्ष विनोद कुमार मोदी, सरपंच, ग्रा.पं. सौंदड, पंकज लोहिया, सचिव, लो. शि. संस्था सौंदड, पुरुषोत्तम लोहिया, सदस्य, लो.शि. संस्था, सौंदड, नरसिंगदास अग्रवाल, उद्योगपती व सामाजिक कार्यकर्ते, आनंदराव घाटबांधे, उपाध्यक्ष, लो.शि. संस्था, सौंदड, मधुसूदन अग्रवाल, सहसचिव लो. शि. संस्था, सौंदड, विद्यालयाच्या प्राचार्या उमा बाच्छल, गुलाबचंद चिखलोंढे, मुख्याध्यापक मनोज शिंदे, पर्यवेक्षक डी. एस. टेंभुर्णे प्राध्यापक आर. एन. अग्रवाल प्रामुख्याने उपस्थित होते.

स्वर्गीय रामेश्वरदासजी लोहिया पुण्यतिथी निमित्त त्यांना दोन मिनिटांचे मौन ठेवून श्रद्धांजली देण्यात आली. विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या आकांक्षा हस्तलिखित पुस्तकाचे विमोचन करण्यात आले. विद्यालयाच्या प्राचार्या उमा बाच्छल यांनी संक्षिप्तपणे विद्यालयाविषयी सर्वव्यापी अहवाल सादर केला. लोहिया शिक्षण संस्थेतर्फे स्नेहसंमेलनाचे उद्घाटक अध्यक्ष व माजी विद्यार्थी डॉ. भरत नरसिंगदास अग्रवाल एम. बी. बी .एस .एम. डी ऑर्थो., डॉ. देवेश नरसिंगदास अग्रवाल, एम.बी.बी.एस.एम.डी., मेडिसिन यांच शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

मान्यवराच्या उपस्थितीत विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी मनुष्याच्या जीवनातील आईच महत्व दर्शविणारे मनमोहक असे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
एस. एस. सी. मार्च २०२४ मध्ये गुणवंत विद्यार्थी कुमारी अल्मास आसिफ शेख प्रथम ९६.००% कुमारी रिद्धी चोपराम मेंढे, कुमारी गायत्री रवींद्र खरवडे द्वितीय ९४.८०%, एच. एस. सी. फेब्रुवारी २०२४ विज्ञान शाखेतील तालुक्यातून प्रथम प्रणय मनोज शिंदे प्रथम ८६.३३% दीपक रवींद्र खरवडे द्वितीय ८४.३३% तसेच एच.एस.सी. फेब्रुवारी २०२४ कला शाखेतील मनीष हेमराज मेंढे प्रथम ८०.३३% कुमारी वर्षा पुंडलिक डोंगरवार द्वितीय ७७.५०% यांना मान्यवर महोदय यांच्या शुभहस्ते स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

स्नेहसंमेलनाचे उद्घाटक राजकुमार बडोले यांनी विद्यार्थ्यांना तसेच उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनील फुंडे तसेच प्रमुख अतिथी  हर्ष विनोदकुमार मोदी, सरपंच, संस्थाध्यक्ष जगदीश लोहिया यांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला संस्थेच्या कार्यकारणीचे पदाधिकारी व सदस्यगण, गावकरी, पालक, निमंत्रित पाहुणे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापक श्री .डी. ए .दरवडे व कु.यू. बी. डोये यांनी केले तर आभार प्राचार्य गुलाबचंद चिखलोंढे यांनी मानले . कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

 

Leave a Comment

और पढ़ें