(संग्रहित छायाचित्र)
- सरपंच हर्ष मोदी यांची तात्काळ कारवाई, कुत्र्याचा केला बंदोबस्त!
सडक अर्जुनी, दी. 27 डिसेंबर : तालुक्यातील ग्राम सौंदड येथील बुधवार बाजारात काळ्या रंगाच्या एका कुत्र्याने दहशत माजवली असून बाजारात अनेकांचा चावा घेतला असून गावात सर्वत्र दहशत माजवली होती, यावर गावातील सरपंच यांनी तत्काळ कारवाई केली असून बाजारात दहशत मजवणाऱ्या त्या स्वानाला ठार केले आहे.
दी. 24 डिसेंबर रोजी म्हणजे बुधवारी दुपार च्या सुमारास गावात भरलेल्या बाजारात काळ्या रंगाच्या एका कुत्री ने एक नाही, दोन नाही तर तब्बल 8 लोकांचा चावा घेतल्याची माहिती समोर आली आहे. यात काही महिलांचा देखील चावा घेतला आहे. या बाबत सौंदड गावातील सरपंच हर्ष मोदी यांनी गावातील नागरिकांना जागृत करण्या संदर्भात व्हॉट्स ॲप ग्रुप वर एक मेसेज टाकला की गावात एका काळ्या रंगाच्या कुत्र्याने काही लोकांचा चावा घेतला असून नागरिकांनी सावध राहावे.
त्यातच ग्राम पंचायत येथील कर्मचाऱ्यांना सदर कुत्र्याला पकडुन जेरबंद करावे अश्या सूचना दिल्या मात्र सदर कुत्रा हा अनियंत्रित असल्याने त्याला ठार केले असून गावातील नागरिकांना दिलासा मिळाला.
सौंदड येथील आरोग्य केंद्रात पाच लोकांवर उपचार
बुधवारी गावात एका कुत्र्याने तब्बल 7 ते 8 लोकांचा चावा घेतला अशी माहिती स्थानिक सरपंच मोदी यांनी माध्यमांशी बोलताना दिली असून यातील पाच लोकांनी सौंदड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार घेतले असून काही रुग्णांना बाहेर पाठवले होते अशी माहिती आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी दिली.
डॉक्टर दीपक आगलावे वैधकिय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय सौंदड –
बुधवारी 4.30 वाजेच्या दरम्यान रुग्णालयात 5 रुग्णांवर उपचार केले त्यांना टी.टी. चे इंजेक्शन व एक लस दिली होती, एका रुग्णाला गोंदिया येथील के.टी.एस. रुग्णालयात उपचारासाठी पाठवले होते तर काहींना साकोली येथे पाठवले होते. आमच्याकडे ईमोनो गलोबिन सिरम नावाची औषध उपलब्ध नसल्यामुळे त्यांना रेफर केले.
यांच्यावर केला उपचार
1) हिराबाई माणिक गिऱ्हेपंजे वय 49 वर्षे, गाव – उमरी, 2) धननु सोभा गिरी वय 45 वर्षे, गाव – सौंदड, 3) महादेव कारू नागरिकर वय 74 वर्षे, गाव – परसोडी, 4) सूरजलाल सोमाजी शाहारे वय 65 वर्षे, गाव – सौंदड, 5) शोभाबाई यादवराव वंजारी वय 90 वर्षे, गाव – सौंदड असे असून वंजारी यांना साकोली येथील रुग्णालयात उपचार करीता पाठविण्यात आले.
हर्ष मोदी, सरपंच सौंदड –
गावातील बाजारात एक काळ्या रंगाचा कुत्रा अनेकांना चावला अशी मला माहिती मिळाली, त्या मुळे ग्राम पंचायत चे कर्मचारी यांना मी सांगितले की त्या कुत्र्याला तात्काळ पकडुन जेर बंद करा, मात्र त्यांच्यावर तो हल्ला करीत असल्याने ना एलाजस्तव त्याला ठार करण्यात आले. गावातील जनावरे, शाळकरी मुले, नागरिक, महिला यांना धोका निर्माण झाला होता, त्या मुळे गावातील नागरिकांच्या रक्षणाकरिता आम्ही तात्काळ कारवाई केली.