आश्वासन दिल्या प्रमाणे धान उत्पादक शेतकऱ्यांना 25 हजार रुपये बोनस ध्या. – ललित बाळबुद्दे

  • वि.का. सेवा सहकारी संस्था च्या वतीने मुख्यमंत्री फडणवीस यांना स्मरण निवेदन

अर्जुनी मोर. दी. 25 डिसेंबर : भंडारा गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना आपण 25 हजार रुपये बोनस देऊ केल्याची शिफारस मागील मुख्यमंत्री यांना करतो असे, आपण आपल्या भाषणात म्हणाले आणि आपनच प्रत्यक्षात 20 हजार रुपयाची घोषणा केली आनंदात असणारे शेतकरी आनंद शुन्य झाल्याबाबत अश्या आशयाचे “स्मरण निवेदन” विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था संघ. तालुका अर्जुनी/ मोरगांव चे अध्यक्ष ललीतकुमार बाळबुद्धे, उपाध्यक्ष सुभाष देशमुख, सचिव अरुण गजापुरे, यांनी दि. 23 डिसेंबर रोजी स्मरण निवेदन” देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री यांना माजी मंत्री परीणय फुके यांच्या मार्फत दिले आहे.

स्मरण निवेदन मध्ये म्हणटले की – सर्वप्रथम आपणास खूप खूप शुभेच्छा. आपण मुख्यमंत्री झालात आपल्या मागील पाच वर्षाच्या मुख्यमंत्री काळात आम्हां धान उत्पादक शेतकऱ्यांना खरंच सुगीचे दिवस आलेले होते. आज शेतकरी दिवसाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा. विषयात नमूद केल्याप्रमाणे आपण भंडारा गोंदियाच्या दौऱ्यावर असताना या दोन्ही जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना आपण बोनस हा 25 हजार रुपये देण्याचे धान उत्पादक शेतकऱ्यांना विश्वास दिले.

असे आपण तत्कालीन मुख्यमंत्री यांना कळवितो असे म्हणाले, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होऊन 25 हजार रुपये बोनस झाले असे सर्वानुमते जाहीर झाले, परंतु अधिवेशनात मात्र 20 हजार रुपये हेक्टरी घोषना झाल्याने धान उत्पादक शेतकऱ्यांमध्ये निराशा पसरली आहे, कृपया शेतकऱ्यांच्या आनंदासाठी त्यांना शेतीला लागणारे उत्पादन खर्च कमी करण्यासाठी याची आवश्यकता आहे.

त्या कारणाने या स्मरण निवेदनाने आपणाला धान उत्पादक शेतकऱ्यांच्या बाजूने आणि आपण भाषणात म्हटल्याप्रमाणे आपण शब्द पाळला ह्या दृष्टीने धान उत्पादक शेतकऱ्यांना 25 हजार रुपये बोनस द्यावे ही विनंती. येणाऱ्या नवीन वर्षाच्या आपणाला, आपल्या परिवाराला आणि आपल्या या महाराष्ट्र परिवाराला. आमच्या धान उत्पादक शेतकऱ्यांकडून हार्दिक शुभेच्छा. ही पात्रातून दिल्या आहेत.

Leave a Comment

और पढ़ें