आपकारीटोलाच्या प्रांगणावर अटल क्रिडा व सांस्कृतिक महोत्सव उत्साहात संपन्न.

सडक अर्जुनी, दी. 26 डिसेंबर : अटल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे तालुकास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आपकारीटोला येथे दिनांक 20, 21, 22 व 23 डिसेंबर 2024 ला आयोजित करण्यात आले होते. अटल क्रीडा सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी लायकराम भेंडारकर गटनेता जिल्हा परिषद गोंदिया यांनी अध्यक्षपद भुसविले तर शिक्षण सभापती यशवंत गणवीर उपाध्यक्ष तथा सभापती शिक्षण व आरोग्य जिल्हा परिषद गोंदिया यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले.

याप्रसंगी यांच्यावर प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समितीच्या सभापती संगीताताई खोब्रागडे उपसभापती शालींदरभाऊ कापगते जि. प. सदस्या कविताताई रंगारी चंद्रकलाताई डोंगरवार, पंचायत समिती सदस्य  अल्लाउद्दीन राजानी ग्रामपंचायत शेंडाच्या सरपंच ग्यारशीताई रामरामे सरपंच ग्रामपंचायत शेंडा उपसरपंच भीमराव राऊत, कल्पना चीचाम, संगीता उईके गटशिक्षणाधिकारी एस.आर. बागडे उपस्थित होते.

याप्रसंगी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून मुख्याध्यापक किशोर बावनकर यांनी साडे पाचशे लोकसंख्या असलेल्या गावात कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे धाडस केल्याबद्दल गावकऱ्यांचे आभार मानले. कार्यक्रमाचे उद्घाटक उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती यशवंत गणवीर यांनी विद्यार्थ्यांना क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. तर अध्यक्ष स्थानावरून माननीय लायकरामभाऊ भेंडारकर यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन करून अटल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यासंबंधाने जिल्हा परिषदेचा उद्देश पटवून दिला.

दिनांक 20 डिसेंबर ला प्राथमिक विभागाचे सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. दिनांक 21 डिसेंबर 2024 ला दिवसभर सांघीक व वेक्तिक खेळ घेण्यात आले व दुपारी 2.00 वाजता उच्च प्राथमिक विभागाचे सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. दिनांक 22 डिसेंबर 2024 ला सांघिक व वैक्तीक खेळाने कार्यक्रमाची सुरवात झाली तर दुपारी दोन वाजता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आपकारीटोला शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन शिक्षक संघटनांचे जिल्हा समन्वयक एस यू वंजारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.

उद्घाटन संचालक विजय डोये यांच्या हस्ते झाले तर मंचावर प्रमुख अतिथी म्हणून हरिराम येळने जिल्हाध्यक्ष पुरोगामी शिक्षक संघटना, चेतन उईके महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ देवरी, संचालक अनिल खंडाईत संचालक विनोद चौधरी संचालक प्रकाश ब्राह्मणकर आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.

दिनांक 23 डिसेंबर 2024 ला थाटामाटात बक्षीस वितरण सोहळा मा.उपविभागीय अधिकारी वरुनकुमार शहारे यांच्या अध्यक्षतेखाली तर बक्षीस वितरक सभापती सौ संगीताताई खोब्रागडे प्रमुख अतिथी तहसिलदार अक्षय पोयाम, जिल्हा परिषद सदस्य निशा तोडासे, ग्रामपंचायत शेंडाचे सरपंच श्रीमती ग्यारशी रामरामे पोलिस पाटील अमोल मानवटकर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सत्यवान गजभिये रजनी शिवणकर जी आर मेश्राम मधुकर टेकाम यांनी उत्तम प्रकारे केले.सुरेश अमले अविनाश पाटील राजू लोणारे यांनी दप्तर सांभाळले. संतोष आरसोडे एस एस मेश्राम मोरू राऊत यांनी मैदानाची देखरेख उत्तमप्रकारे केली.
विद्यार्थ्याच्या जेवणाची मोफत सोय करून आपकारीटोला ग्रामवासीयांच्या सहकार्याने तालुकास्तरीय अटल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आपकारीटोला येथे यशस्वीरित्या संपन्न झाला.

Leave a Comment

और पढ़ें