जुन्या रामनगर पोलीस स्टेशनला लागली आग, जप्त केलेले दोन कार जळून खाक 

गोंदिया, दी. 25 डिसेंबर : गोंदिया शहरातील जुन्या रामनगर पोलीस स्टेशनला दी. 24 डिसेंबर रोजी च्या मध्यरात्री 12 च्या सुमरास भिषण आग लागली, आगीत जप्त केलेले दोन कार जळून खाक झाल्या असून पोलीस स्टेशन हे नवीन इमारतीत स्थानांतर केल्यामुळे रिकाम्या इमारतीला ही आग लागली.

त्यामुळे कुठलेही शासकीय दस्तावेजाचे नुकसान झाले नाही. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचां प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. आगीची माहिती नगर परिषद प्रशासनाला देण्यात आली असून अग्नीशमन विभागाचे दोन वाहन घटनस्थळी दाखल करीत आग आटोक्यात आनली आहे. या घटनेत कुठलीही जीवित हानी झाली नाही.

Leave a Comment

और पढ़ें