- बांधकाम विभागासह स्थानिक लोक प्रतिनिधींचे सर्रास दुर्लक्ष ?
सडक अर्जुनी, ( बबलु मारवाडे ) दी. 29 डिसेंबर : संपूर्ण तालुक्यातील नागरिकांना रेशन च्या माधमातुन ज्या लाल गोडाऊन मधून धान्याचा पुरवठा केला जातो त्या गोडाऊन कडे जाणाऱ्या रस्त्याची संपूर्ण चाळण झाल्याचे चित्र आहे. या बाबत महाराष्ट्र केसरी न्यूज ने अनेक वेळ वृत्त प्रकाशित केले परंतु स्थानिक बांधकाम विभाग व स्थानिक लोकप्रतिनिधींनी याकडे सातत्याने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे या मार्गाने चालणाऱ्या वाहनधारकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. गेले अनेक वर्षे पासून सदर मार्ग दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे, परंतु बांधकाम विभाग यंत्रणा व स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या दुर्लक्षितपणामुळे या रस्त्याची आजही दयनीय अवस्था आहे. या मार्गाचा कधी काम होणार आणि वाहनधारकांना कधी सुटकेचा निस्वास मिळणार अशी प्रतीक्षा आहे.
- येथे होतो हजारो क्विंटल धान्याचा साठा.
शासनाच्या वतीने मिलिंग केले हजारो क्विंटल सी.एम.आर. चे तांदूळ देखील याच गोडाऊन मध्ये ठेवले जाते, तर खरेदी केलेला मक्का देखील येथेच साठवण केला जातो, विशेष म्हणजे याच गोडाऊन मधून नाशीक सारख्या अनेक शहरात धान्य पुरवठा केला जातो, तर तालुक्यातील 114 रेशन दुकानामध्ये वाटप केला जाणारा तांदूळ, गहू व साखर देखील येथूनच पुरवठा केला जातो, एकंदरीत हजारो क्विंटल धान्याचा साठा या ठिकाणी केला जातो, मात्र ज्या मार्गाने वाहने चालतात त्या मार्गाची संपूर्ण दयनीय अवस्था असल्याचे चित्र आहे.
- महिन्याला 6 हजार 333 क्विंटल रेशन कार्ड धारकांना वाटप
सडक अर्जुनी तालुक्यात एकूण अंतोदय कार्ड धारकांची संख्या 8862 एवढी असून लोक संख्या 34890 आहे. तर पी.एच.एच. चे एकूण कार्ड धारकांची संख्या 15582 एवढी असून लोक संख्या 64652 एवढी आहे. फूड विभागाने दिलेल्या माहिती नुसार महिन्याला गहू व तांदूळ एकूण 6 हजार 333 क्विंटल रेशन कार्ड धारकांना वाटप केला जातो. तर गेली 8 ते 9 महिन्यापासून साखर उपलब्ध झाली नाही, मात्र ज्या मार्गाने हा रेशन गोडाऊन मधून बाहेर काढला जातो, किंवा गोडाऊन मध्ये ठेवले जाते, त्या मार्गाची संपूर्ण जर्जर अवस्था झाली आहे. या मार्गावर खोल खड्डे पडले असून वाहन धारकांना मार्ग सोधत जावे लागते. अनेक वेळ बातम्या प्रकाशित करून सुधा बांधकाम विभाग व स्थानिक लोप्रतिनिधींनी निंद्रा अवस्थेत आहेत, पुरवठा धारकांच्या वाहनाचे येथे अनेक अपघात झाले असून वाहनांची मोड तोड झाली आहे. परंतु अजूनही या गंभीर बाबींकडे दुर्लक्ष केले जात आहे. वृत्त प्रकाशित झाल्यानंतर आता तरी प्रशासन जागे होणार का ? असा सवाल देखील या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.