(संग्रहित छायाचित्र)
सौंदड, दी. २९ डिसेंबर : लोहिया शिक्षण संस्थाद्वारा संचालित रामेश्वरदास जमनादास लोहिया माध्यमिक व उच्च माध्यमिक (कला व विज्ञान), रामदेवबाबा अध्यापक विद्यालय व जमुनादेवी लोहिया प्राथमिक शाळा सौंदड यांच्या संयुक्त स्नेहसंमेलन दिनांक २९ डिसेंबर २०२४ ते १ जानेवारी २०२५ या दरम्यान संपन्न होत आहे.
स्नेहसंमेलनाचे उद्घाटन तसेच स्व. रामेश्र्वरदास जमनादास लोहिया पुण्यतिथी निमित्त प्रतीमेस माल्यार्पण व श्रद्धांजली दिनांक २९ डिसेंबर २०२४ रोज रविवारला सकाळी १०.४५ वाजता अर्जुनी/ मोर विधानसभा क्षेत्राचे आमदार राजकुमार बडोले यांच्या हस्ते, अध्यक्ष, भंडारा जिल्हा मध्य. सह बँक मर्या. भंडारा सुनील फुंडे यांच्या अध्यक्षतेखाली, लोहिया शिक्षण संस्थेचे संस्थापक – संस्थाध्यक्ष जगदीश लोहिया, सरपंच ग्राम पंचायत सौंदड हर्ष विनोदकुमार मोदी, लोहिया शिक्षण संस्थेचे सचिव पंकज लोहिया, उद्योगपती व सामाजिक कार्यकर्ते नरसिंगदास अग्रवाल, लो.शि.संस्थेचे उपाध्यक्ष आनंदराव घाटबांधे , लो.शि. संस्थेचे सहसचिव मधुसूदन अग्रवाल, माजी सदस्य जि .प भंडारा व वि .का .से. सह . संस्थेचे अध्यक्ष प्रभूदयाल लोहिया, लोहिया शिक्षण संस्थेचे सदस्य मा. कन्हैयालाल लोहिया, पुरुषोत्तम लोहिया, रामभाऊ झोडे, परेश लोहिया यांच्या प्रमुख आतिथ्याखाली संपन्न होत आहे.
अतिथींच्या शुभहस्ते विद्यालयाचे माजी विद्यार्थी डॉ. भरत नरसिंगदास अग्रवाल, एम. बी. बी. एस., डी. ऑर्थो व डॉ. देवेश नरसिंगदास अग्रवाल एम. बी. बी. एस., एम. डी (मेडिसिन) यांचा सत्कार तसेच एच. एस. सी. फेब्रु.२०२४ विज्ञान व कला शाखा व एस. एस. सी. मार्च २०२४ मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा संस्थेतर्फे स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे.
दिनांक ३० डिसेंबर २०२४ रोज सोमवारला सकाळी १०.३० वाजता सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन मंगेश काळे, पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन डुग्गीपार यांच्या शुभहस्ते जगदीश लोहिया यांच्या अध्यक्षतेखाली तर निशा तोडासे सदस्य जि. प. गोंदिया, गायत्री इरले, माजी सरपंच, सौंदड, रूपाली टेंभुर्णे माजी सदस्य जि.प. गोंदिया, वर्षा शहारे सदस्य पं. स. सडक /अर्जुनी, सीमा निंबेकर पोलीस पाटील, सौंदड, समिता इरले अध्यक्ष तं.मु.स. सौंदड यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे.
यावेळी विविधरंगी समाज प्रबोधनात्मक, देशभक्तीपर, विविध संस्कृतीचे दर्शन, सामाजिक समस्या, अंधश्रद्धा निर्मूलन जागरण करणारे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जाणार आहेत. दिनांक ३१ डिसेंबर २०२४ रोज मंगळवारला सुद्धा विद्यार्थ्यांच्या विविध आकर्षक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन स. १०.३० वाजता पासून सादर करण्यात येतील अशी माहिती लोहिया शिक्षण संस्था तर्फे देण्यात आले आहे.
तर दिनांक ०१ जानेवारी २०२५ रोज बुधवारला स.१०. ३० वाजता बक्षीस वितरण व समारोप समारंभ बक्षीस वितरक डॉ. महेंद्र गजभिये शिक्षणाधिकारी (माध्य.), जि. प. गोंदिया, सुधीर महामुनी शिक्षणाधिकारी (प्राथ.) जि. प. गोंदिया यांच्या अध्यक्षतेखाली जगदीश लोहिया, संस्थापक – संस्थाध्यक्ष लो.शि.संस्था, सुरेशकुमार लोहिया, कोषाध्यक्ष लो.शि.संस्था, सुभाष बागडे, गटशिक्षणाधिकारी पं.स. सडक अर्जुनी, चिंतामण थेर, सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी यांच्या प्रमुख आतिथ्याखाली संपन्न होणार आहे.
उपरोक्त कार्यक्रमांना पालक व परिसरातील जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन प्राचार्य उमा बाच्छल, मुख्याध्यापक मनोज शिंदे, प्राचार्य गुलाबचंद चिखलोंडे, स्नेहसंमेलनाचे सांस्कृतिक कार्य. विभाग प्रमुख, संयोजक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केले आहे.