गोंदिया, दी. २७ जून : दासगाव येथे खांबावर चढून लाईटचे काम करणाऱ्या तरुणाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना आज २६ जून रोजी घडली आहे. वीज विभागाचे कर्मचारी लाईनमन तरोणे यांनी आपल्या कामासाठी गावातील नितेश बिसेन (२७) या तरुणाला लाईट चालू असलेल्या खांबावर चढवून काम करून घेत होते.
दरम्यान अचानक विजेचा धक्का लागल्याने नितेश बिसेन यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर मृतक तरुणाच्या नातेवाइकांनी चांगलाच गोंधळ घातला. याची माहिती पोलीस विभागाला दिली असता याप्रकरणी रावणवाडी पोलिस ठाण्यात लाइनमनविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
Author: Maharashtra Kesari News
Post Views: 224