गोंदिया, दि. 30 जुन : अपंग गर्भवती स्त्रीचा ढासगड जंगलात कोयत्याने निर्घृण खून करणाऱ्या तिघांना जन्मठेपेची शिक्षा दि. 29 जुन रोजी मा. न्यायालयाने सुनावली असून यातील आरोपी नामे : 1) मो. समीर अस्लाम शेख, वय 26 वर्ष, रा. वार्ड क्र. 4, बाजार वार्ड लाखनी, जिल्हा – भंडारा, 2) आशिफ शेरखाँ पठाण, वय 38 वर्ष, रा. बाबा मस्तानी, जिल्हा – भंडारा, 3) प्रफुल्ल पांडुरंग शिवणकर, वय 25 वर्ष, रा. दुधा, पो. डबा, ता. उमरेड, जिल्हा – नागपूर
अशी जन्मठेप झालेल्या आरोपीतांची नावे असून या तिघांनीही घटना दिं. 23- 07- 2021 रोजी एका अपंग गर्भवती अनओळखी महिला वय अंदाजे 25 ते 30 वर्ष हिला धारदार हत्याराने गळा कापून तिला रोडवर जीवानिशी ठार करून, रोडाने बाजूला ओडत नेवून ढासगड जाणाऱ्या डांबरी रोडपासून 25 फूट अंतरावर नेवून फेकले आहे. असे फिर्यादी चे रिपोर्ट वर पोलीस ठाणे चिचगड येथे अपराध क्र : 70/2021 कलम 302, 201 (ब), 34 भा. द. वि. प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचे तपासा दरम्यान आरोपीना भंडारा, बुटीबोरी, येथुन अटक करण्यात आली होती. आरोपी विरूध्द सबळ साक्ष पुरावे, परिस्थितीजन्य पुरावे गोळा करून तपासाअंती गुन्ह्याचे दोषारोप पत्र क्र : 17/2021 दिनांक 07/10/2021 अन्वये न्यायालयात दाखल करण्यात आले होते. मा. न्यायालयात गुन्ह्याचे से. ट्रा. केस क्र. 130/2021 दिनांक 29/10/2021 प्रमाणे खटला चालविण्यात आला.
माननीय न्यायालयात सदर खटल्याचे सुनावणीत युक्तिवादानंतर सबळ साक्ष पुराव्यावरून आरोपीतांविरुद्ध गुन्हा केल्याचे दोष सिद्ध झाल्याने माननीय प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. वानखेडे जिल्हा व सत्र न्यायालय गोंदिया यांनी आज दिनांक 29- 06- 2024 रोजी सदर खटल्याचा न्यायनिवाडा करून गुन्ह्यातील तिन्ही आरोपी यांना जन्मठेपेची शिक्षा व दहा हजार रुपये आर्थिक दंडाची शिक्षा ठोठावलेली आहे.
सदर गुन्ह्याचे तपास कामकाज तपासी अधिकारी प्रथम तपासी अधिकारी पोउपनि मनोहर इस्कापे, पो. स्टे. चिचगड यांनी केले असून तपासी अधिकारी म्हणून श्री जालिंदर नालकुल सा. उप.वि.पो. अधि. आमगांव अतिरिक्त कार्यभार देवरी यांनी केलेले आहे.