चुलबंद नदीला पानी आल्याने महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांचे पाप गेले धूवून!

  • चार महिन्यात तालुक्यातून तब्बल पाच कोटी रुपयाचा महसूल चोरीला?
  • रेतीच्या अवैध उपश्या मुळे नदी पात्रातील शेतकऱ्यांच्या बोरवेल देखील पडल्या उघळ्या.
  • तालुका महसूल प्रशासनाचे मात्र सातत्याने दुर्लक्षच.

सडक अर्जुनी ( बबलु मारवाडे ) दि. 30 जुन : गेली चार महिने पासून सातत्याने तालुक्यातून अवैध रित्या गौण खनिज उत्खनन करून वाहतूक करण्याचा सपाटा सुरू होता, याकडे तालुका महसूल विभागाने सातत्य पूर्ण दुर्लक्ष केले होते, त्या मुळे सडक अर्जुनी तालुक्यातून अंदाजे पाच कोटी रुपयाचा महसूल अवैध मार्गाने चोरी झाल्याचे चित्र आहे, तालुक्यातून विना परवाना मुरूम सह रेतीचे उत्खनन करून वाहतूक मोठ्या प्रमाणावर करण्यात आली आहे, तालुक्यातील प्रत्येक नदी व नाल्यातून वाळूचा उपसा झाल्याचे ही चित्र आहे, 27 जुन रोजी तालुक्यात आलेल्या पावसाने नदी व नाल्याला पूर ( पानी ) आले, त्या मुळे चोरी झालेल्या वाळूचे खड्डे पाण्याने भुजल्याचे चित्र आहे, म्हणून महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांचे पाप पाण्याने धूवून गेले अशल्याची तालुक्यात चर्चा आहे.  

तालुक्यातून होत असलेले महसूल चोरी बाबद महाराष्ट्र केसरी न्युज ने सातत्याने वृत्त प्रकाशित केल्याने काही विशिष्ट लोकांवर महसूल विभागाने नाम मात्र जप्तीची कारवाई केली आहे. तर ज्या लोकांबरोबर हीत संबंध होते त्यांना संरक्षण दिले, याचे उत्तम उदाहरण गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुका अंतर्गत येणारे ग्राम पळसगाव ते सौंदड नदी पात्रात आहे.

या भागातून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या रेतीचा उपसा करून वाहतूक करण्यात आली आहे. नदीपात्रात शेतकऱ्यांनी लावलेल्या बोरवेल देखील रेतीमाफियांनी उघळे केल्याचे चित्र आहे. सातत्याने होत असलेल्या अवैध रेती उपश्यामुळे नदीपात्र खोल झाले आहेत. यामुळे भविष्यात जल पातळीत देखील मोठी घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

महसूल विभागाने दिलेल्या माहिती नुसार 2024 मध्ये सडक अर्जुनी तालुक्यातील एकही रेती घाट लिलाव झालेले नव्हते. असे असले तरी अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्या व्यवसायिकांनी नदीपात्र संपूर्ण पोखरून टाकले आहे. मात्र स्थानिक तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांनी सातत्याने दुर्लक्ष केले आहे. रात्रीला नव्हे तर दिवसाला या भागातून मोठ्या प्रमाणात रेतीची चोरी सुरू होती, भर दिवसा गावातून अवैध रेती वाहतूक करणारे वाहन भरधाव वेगाने धावतात, यामुळे अपघात होण्याची भीती आहे, अवैध रेती उत्खननामुळे रस्त्यांची देखील दयनीय अवस्था झाल्याचे चित्र आहे.

तालुक्यातील एकही वाळूघाट लिलाव झालेला नसला तरी तालुक्यातील सर्वच रेती घाटातून मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा झाला आहे. त्यामुळे रेती घाट लिलावात घेण्यापेक्षा चोरलेली रेती मोठ्या प्रमाणात रेतीमाफीयांना परवडत आहे. पळसगाव रेती घाटातून झालेल्या रेतीचा उपसाचे दयनीय चित्र आहे. या भागामध्ये मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा करून त्याची साठवणूक आजही करून ठेवलेली आहे. हीच रेती जेसीबीच्या साह्याने ट्रक मध्ये भरून तालुक्या बाहेर विक्रीसाठी पाठवली जाते. सध्या रेतीचे भाव वाढले आहेत. तालुक्यातील घरकुल धारकांना ही वाळू परवडन्या सारखी नाही. एकीकडे शासन घरकुलधारकांना पाच ब्रास रेती मोफत देण्याचे आश्वासन देते, मात्र दुसरीकडे या आश्वासनाचा कुठेही फलित होताना दिसत नाही. घरकुल धारकांना महागडी रेती विकत घ्यावी लागते.

तालुक्यातून झालेल्या अवैध रेती उपशामुळे नदीपात्र संपूर्ण पोखरून टाकले आहे. काही ठिकाणी तर नदीपात्रात असलेल्या शेतकऱ्यांच्या बोरवल आता उघडे पडू लागले आहेत. नदीपात्रात जवळपास 3 ते 4 फूट खोल खड्डे निर्माण झाल्याचेही चित्र आहे. सातत्याने होत असलेल्या अवैध रेती उपशामुळे प्रशासनाला रोज लाखो रुपयाचा चुना लागत आहे. असे असले तरी तालुका महसूल विभाग मात्र निंद्रिय अवस्थेत आहे. तालुक्यातील विविध नदी व नाल्यातून अंदाजे चार महिन्यात तब्बल पाच कोटी रुपयाचा अवैध मार्गाने महसूल चोरीला गेला आहे. महसूल विभाग याची चौकशी कधी करणार याकडे तालुका वासियांचे लक्ष लागले आहे.

 

Leave a Comment

और पढ़ें