गोंदिया रेल्वे मार्गाने धावणाऱ्या ज्ञानेश्वरी एक्स्प्रेसच्या ४ तर आझाद हिंद च्या ६ फेऱ्या रद्द !

बिलासपूर विभागात २४ ते ३० जूनपर्यंत ब्लॉक, प्रवाशांना बसणार फटका

गोंदिया, दि. २५ जुन : दक्षिण-पूर्व मध्य रेल्वेच्या बिलासपूर विभागातील कोतरलिया रेल्वे स्थानकाजवळ २४ ते ३० जून दरम्यान प्री-नॉन इंटरलॉकिंग आणि नॉन इंटरलॉकिंगचे काम केले जाणार आहे. या तांत्रिक कामाकरिता विविध तारखांना १६ एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. 

या गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे.

१२१२९ पुणे-हावडा आझाद हिंद एक्स्प्रेस २७ जून ते २ जुलै या कालावधीत प्रस्थान स्थानकावरून रद्द करण्यात आली आहे.१२१०१ एलटीटी- शालिमार ज्ञानेश्वरी एक्स्प्रेस २४, २५, २८ आणि २९ जून रोजी, तर १२१०२ शालिमार- एलटीटी ज्ञानेश्वरी एक्स्प्रेस २६, २७, ३० जून आणि १ जुलै रोजी त्यांच्या प्रस्थान होणार आहे. 

१२८६० हावडा -सीएसएमटी मुंबई गीतांजली एक्स्प्रेस २४ ते २९ जूनपर्यंत, १२८५९ सीएसएमटी मुंबई- हावडा एक्स्प्रेस २६ जून ते १ जुलैपर्यंत, १२९०५ पोरबंदर- शालिमार एक्स्प्रेस २६ आणि २७ जून रोजी, १२९०६ शालिमार -पो- रबंदर एक्स्प्रेस २८ आणि २९ जून रोजी २२८४६ हटिया- पुणे एक्स्प्रेस २४ आणि २८ जून रोजी, तर २२८४५ पुणे- हटिया एक्स्प्रेस २६ आणि ३० जून रोजी परिवर्तीत मार्गाने धावणार आहेत.

२०८२२ संत्रागाछी- पुणे हमसफर एक्स्प्रेस २९ जून रोजी, तर २०८२१ पुणे- संत्रागाछी हमसफर एक्स्प्रेस १ जुलै रोजी रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये गोंदिया मार्गे धावणाऱ्या आझाद हिंद व ज्ञानेश्वरी एक्स्प्रेसच्या अनुक्रमे ६ व ४ फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. 

Leave a Comment

और पढ़ें