सौंदड येथे अवैधरित्या दारू विक्री जोमात, भांडणातून एकाला जबर मारहाण

सडक अर्जुनी, ( बबलु मारवाडे ) दिनांक 26 सप्टेंबर 2024 : डुग्गीपार पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेले ग्राम सौंदड येथे मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या दारूची विक्री केली जाते, गावात एक-दोन नाही तर तब्बल 20 ते 25 ठिकाणी अवैधरित्या मोह फुलाची दारू, देशी, विदेशी बनावट दारू खुलेआम विनापरवाना विकली जाते, तर सौंदड येथूनच अन्य गावांना दारूची अवैध रित्या खेप पोहचविली जाते, आणि यावर नियंत्रण करण्याची जबाबदारी ज्यांच्याकडे आहे, त्यांच्याकडून पाहिजे तशी कारवाई होत नसल्यामुळे दारू विक्रेत्यांची या ठिकाणी हिम्मत वाढत चालली आहे.

24 तास दारू विक्रीमुळे गावामध्ये कलह निर्माण होत असून, भांडणे व तंटे मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे, याचा उत्तम उदाहरण म्हणजे, 23 सप्टेंबर रोजी च्या सायंकाळी सौंदड येथील हिरबाजी स्टेडियम येथे असलेले एका पानटपरी शेजारी एका व्यक्तीला दोन व्यक्तींनी जबर मारहाण करून त्याला जखमी केले, तक्रारदाराने दोन आरोपी विरुद्ध तक्रार दिल्यामुळे डुग्गीपार पोलिसांनी दोन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

ज्या ठिकाणी हे भांडण झाले, त्याच्या अगदी दोन घर बाजूला अवैधरित्या दारू विक्रीचा व्यवसाय गेल्या अनेक वर्षापासून फोफावला आहे, आणि या ठिकाणी पोलीस ड्रेस घातलेले अनेक लोक ग्राहक म्हणून आपली हजेरी लावतात, त्यामुळे येथे पाहिजे तशी कारवाई केली जात नाही, सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार तक्रारदार हा देखील त्या दुकानातून नुकताच बाहेर आला, आणि पान टपरी मध्ये गुटखा घेण्यासाठी थांबला होता, आणि तितक्यात तो बाजूला मूत्र विसर्जन करण्यासाठी गेला असता, आरोपी व तक्रारदार यामध्ये बाचाबाची झाल्याने भांडण झाले. 

यातील तक्रारदार मोहीत मनोहर मोदी वय 28 वर्ष रा. बोपाबोडी असे असून यातील आरोपी 1) जितेन्द्र गोंविंद पुरी वय अंदाजे 35 वर्षे, व त्याचा जावाई अंदाजे वय 35 वर्षे असे असून सौंदड येथील सचिन हटकर यांच्या पानटपरी जवळ दि. 23 सप्टेंबर रोजी सायंकाळी 07 : 15 वाजता मारहाणीची घटना घडली आहे, यातील फिर्यादी याने पोलिसांना दिलेल्या माहिती नुसार तो हात उसने पैसे देण्या करीता आपल्या मोटर सायकलने सौंदड येथे आला असता वरील दोन आरोपी यांनी फिर्यादी याला पान टपरीच्या बाजुला असलेल्या खुल्या पंटागंणावर पेशाब करण्या करीता गेला असता.

यातील आरोपींनी ईथे कशाला पेशाब करतेस मा***द असे म्हणुन फिर्यादीच्या डोक्याला बुक्यानी मारहान केले व हातात कळा असल्याने तो फिर्यादिच्या डोक्याला लागुन रक्त निघाला असे फिर्यादीच्या तोंडी रिपोर्ट वरुन व वैद्यकीय परिक्षण अहवालावरुन दोन्ही आरोपी विरुद्ध अप. क्र. 344/2024 कलम 118 (1), 352, 3 (5) भा. न्या. सं. 2023 अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे, सदर घटनेचा तपास तपास स. फौ. निर्वाण/781 हे करीत आहेत.

सौंदड गाव हे अवैध व्यवसायासाठी गाजले आहे, गावामध्ये अवैधरित्या दारू व गांजाची विक्री केली जाते, त्याचबरोबर महामार्ग लगत असलेल्या दुकानांमध्ये अनेक नशाचे पदार्थ विक्री केली जातात, तर ट्रक मधून डिझेल काढून विक्री केली जाते, ट्रक मध्ये असलेले साहित्य, दुकानदारांना विक्री केली जाते सौंदड, फुटाळा व श्रीराम नगर परिसरामध्ये व्यवसाय मोठ्या जोमात पसरले असून यावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा बग्याच्या भूमिकेत आहे, या बाबद वारंवार वृत्त प्रकाशित करणारे पत्रकार या भागात बदनाम आहेत?

 

Leave a Comment

और पढ़ें