- ग्राम पंचायतीने ठराव घेत येणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा घेतला निर्णय.
साकोली, दि. 26 सप्टेंबर : साकोली विधानसभा क्षेत्रातील ग्राम देवरी, सायगाव, सानगाव या गट ग्रामपंचायतिने ठराव घेत येणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे, गावांचा विकास झाला नाही, पक्के रस्ते नसल्याने हा निर्णय घेतला आहे, एकिकडे देश अमृत महोत्सव साजरा करतोय मात्र सानगाव येथे जाण्यासाठी अजूनही पक्का रस्ताच नाही, भावी मुख्यमंत्री नाना पटोले यांच्या मतदार संघाचा विकास खुंटला असेल तर संपूर्ण महाराष्ट्राची कल्पना न केलेलीच बरी.
महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री म्हणून नाना पटोले यांचा मोठा गाजा वाजा कार्यकर्त्यांनी केला होता, त्याबाबत बॅनर पोस्टरही लागले होते, मात्र यांच्या मतदार संघात पक्के रस्ते नाही म्हटल्यावर आपल्याला धक्काच बसेल पण हे सत्य आहे, आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला आहे. पण अजूनही ग्रामीण भागात पक्के रस्तेच नाही म्हटल्यावर आपल्याला नवलच वाटेल.
नुकताच आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला आहे, मात्र अजूनही भंडारा जिल्ह्यातील ग्रामीण भागात पक्के रस्ते नाही म्हटल्यावर आपल्याला विचार पडला असेल मात्र हे सत्य आहे, भावी मुख्यमंत्री संबोधल्या जाणाऱ्या कॉग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले याचा साकोली मतदार संघात विकास मात्र खुंटला असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे, लाखनी तालुक्यातील गट ग्रामपंचायत असलेलं देवरी, सानगाव, सायगाव जंगल व्याप्त भागात गाव असल्याने नेहमी याकडे दुर्लक्ष केलं जाते, गावाला जायला पक्का रस्ता नाही. दुसरीकडे सायगाव येथे तर स्वातंत्र्य काळापासून जाण्यासाठी पक्का रस्त्याच्या प्रतिक्षेत आहेत, अनेकदा निवेदन दिले, मात्र अजूनही याकडे दुर्लक्षच आहे, म्हणून येणार्या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय ग्रामपंचायत व गावकर्यांनी घेतला असून तसा ठराव देखील घेण्यात आला आहे.
एकीकडे राज्यात राजकीय चिखलफेक सुरु आहे, नेते स्वतःच्या स्वार्थापोटी या पक्षातून त्या पक्षात उडया मारताना दिसतात मात्र सर्व सामान्यांच्या प्रश्नाचा यांना विसर पडला असल्याचं चित्र दिसत आहे, एक नाही तर गट ग्रामपंचायत असलेलं हे तिन्ही गाव विकाच्या मुख्य प्रवाहातून कोसो दूर आहेत. या गावांची परिस्थिती पाहिल्यावर स्वतंत्र पूर्वीची परिस्थीती असल्याचे दिसून येते, याच कच्या रस्त्यानी गर्भवती महिला, शाळकरी मुले प्रवास करीत आहेत, दुसरीकडे एसटी बस देखील गावात पोहचली नाही, पावसाळ्यात तर या रस्त्यांवर जाताना तारेवरची कसरत करावी लागत असल्याची माहिती रमेश खांडेकर , उपसरपंच सायगाव, उपेंद्र शेंडे, सरपंच देवरी, संगीता वासनिक , आशासेविका सायगाव, सम्यक गाडवे विद्यार्थी, व गावकरी यांनी मीडियाशी बोलताना दिली आहे.
एकीकडे नाना पटोले हे भावी मुख्यमंत्री व्हावे अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे, मात्र भावी मुख्यमंत्री यांच्याच मतदार संघाचा विकास खुंटला असेल तर संपूर्ण महाराष्ट्राचा विकास कसा होणार हा खरा प्रश्न उपस्थित होत आहे, येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये याचा फटका काँग्रेस पक्षावर आणि नाना पटोले यांच्यावर बसणार का? हे पाहण्यासारखे असेल.