सडक अर्जुनी, दि. 26 सप्टेंबर : मा. नामदार उच्च न्यायालय बॉम्बे व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गोंदिया, तालुका विधी सेवा समिती सडक अर्जुनी, वकील संघ तसेच ग्रामपंचायत सौंदड यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २८ सप्टेंबर २०२४ रोजी होणाऱ्या लोकअदालत संदर्भात सौंदड येथे आज दिनांक : २६ सप्टेंबर २०२४ (गुरुवारी) रोजी सायंकाळी ५.०० वाजता जय बजरंग सांस्कृतिक सभागृह, बाजार चौक सौंदड येथे लोकअदालत संदर्भात जनजागृतीस्पर लोकनाट्याचे आयोजन करण्यात आले आहे.
लोकअदालत मध्ये तडजोड पात्र फौजदारी प्रकरणे, दिवाणीस्वरुपाचे दावे, कौटुंबिक हिंसाचार प्रकरणे, चेक बाउन्सिंगची प्रकरणे, बँक कर्ज, कामगार वादाची प्रकरणे, वैवाहिक वाद, अपघात न्यायाधीकरण, भूसंपादन, महसुली बाबतची प्रकरणे, मोटार वाहन चलान, शुल्लक अपराध संबंधी गुन्हा कबुली तसेच दाखलपुर्व म. रा. वि. म. विज बिल, ग्रामपंचायत वीज-पाणी व इतर टॅक्स देयका बाबतची प्रकरणे ठेवण्यात येणार आहेत.
तरी सर्व ग्रामस्थांनमधे राष्ट्रीय लोकअदालतीची जनजागृती व्हावी, नागरिकांना त्याचे महत्व व फायदे समजावे, त्यांचा अमूल्य वेळ व पैसा वाचवा या हेतूने लोकनाट्या व्दारे जनागृती कार्यक्रमाचे आयोजन सौंदड येथे करण्यात आले आहे. तरी सर्व गावकऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा व कार्यक्रमाला यशस्वी करण्यास सहकार्य करावे असे आव्हान आयोजकांनी केले आहे.