धोकादायक वळण केले सुरक्षीत, डुग्गीपार पोलीसांचा स्तुत्य उपक्रम

सडक अर्जुनी , दि. 26 सप्टेंबर : कोहमारा ते गोंदिया जाणा-या राष्ट्रीय महामार्ग क्र. 753 वरिल मुरदोली फाटयाजवळ असलेल्या वळणावर पावसाळयामुळे रस्त्याच्या कडेला मोठया प्रमाणावर गवत व झाडे-झुडपे वाढल्याने येणा-या जाणा-या वाहनांच्या चालकांना समोरील वाहन दिसत नसल्याने सदर वळण हे अपघाताला आमंत्रण देणारे बनत चालले होते.

दिवसेंदिवस वाढत्या अपघातांची संख्या लक्षात घेता व सदर ठिकाणी होणारा संभाव्य गंभीर अपघाताचा धोका ओळखून डुग्गीपार पोलीसांनी दि. 25 सप्टेंबर रोजी मुरदोली फाटयाजवळील वळणावरील गवत व झाडे-झुडपे कापून रस्ता येणा-या जाणा-या वाहनांसाठी मोकळा व सुरक्षीत केला. सदर कार्यवाही करत असतांना येणा-या जाणा-या वाहन चालकांनी डुग्गीपार पोलीसांच्या उपक्रमाची प्रसंशा केली. सदर उपक्रम ठाणेदार मंगेश काळे पो.स्टे. डुग्गीपार यांचे मार्गदर्शनात राबविण्यात आला आहे.

Leave a Comment

और पढ़ें