गोंदिया, दी. २५ जून : जिल्ह्यात दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील वन विभाग आणि सेवा संस्थेच्या माध्यमातून २२ आणि २३ जुन रोजी सारस पक्षी गणना करण्यात आली आहे. पहिल्या टप्यात झालेल्या सारस गणनेत या वर्षी २२ ते २५ सारस पक्षी आढळून आले. गोंदिया जिल्याचा वन वैभव समजल्या जाणाऱ्या सारस पक्ष्यांची गणना वर्ष २०१२ पासून गोंदिया जिल्यात सुरु करण्यात आली होती. मधल्या काळात फक्त गोंदिया जिल्यात ३५ च्या वर सारस पक्षी आढळून आले होते.
कालांतराने हि संख्या घटत गेली मात्र वन विभाग, कृषी विभाग आणि सेवा संस्था तसेच इतर संथांच्या माध्यमातून सारस पक्ष्या संदर्भात जण जागृती करण्यात आल्याने सारस पक्ष्याची संख्या वाढत गेली तर या वर्षी गोंदिया जिल्ह्यातील सारस पक्ष्यांचे अधिवास असलेल्या गोंदिया, तिरोडा व आमगाव तालुक्यांतर्गत एकूण 70 वेगवेगळ्या ठिकाणी जिल्ह्यातील अशासकीय स्वयंसेवी संस्थेचे स्वयंसेवक, सारस मित्र, शेतकरी व गोंदिया वन विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही गणना सकाळी 5 ते 9 वाजेपर्यंत केलेली असून सारस पक्षी गणणे मध्ये यंदा एकूण २२ ते २५ सारस पक्ष्यांची नोंद झालेली आहे.
काही स्थळांवर अपेक्षित असणारे सारस पक्ष्यांची जोडपी निदर्शनास न आल्याने सदर ठराविक स्थळांवर पुन्हा चमू 3 ते 4 दिवस भेट देवून गणना करणार आहे. सदर गणना पुर्ण झाल्यानंतर नेमकी सारस पक्ष्यांची संख्या कळेल. सेवा संस्था चे अध्यक्ष सावन बहेकार, गोंदिया वन विभागाचे डीएफओ पंचभाई यांनी याबाबद माहिती दिली आहे, मागील वर्षी झालेल्या सारस गणनेत गोंदिया जिल्यात 31 सारस पक्षी तर भंडारा जिल्यात ४ सारस पक्षी तर बाजूला लागून असलेल्या बालाघाट जिल्यात 49 सारस पक्ष्यांची नोंद करण्यात आली होती.