सडक अर्जुनी, गोंदिया, दिंनाक : १० फेब्रुवारी २०२३ : महान त्यागी बाब झुमदेवजी यांच्या जयंतीच्या निमित्ताने हा वेशन मुक्तीचा दिवस राज्य सरकारने पाळला पाहिजे. असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे माजी केबिनेट मंत्री राजकुमार बडोले. यांनी मंचावरून केले. ते तालुक्यातील ग्राम डव्वा येथे आयोजित एका कार्यक्रमात मंचावरून बोलत होते. ते पुढे म्हणाले हे वेशन मुक्तीच कार्यक्रम खऱ्या अर्थाने राज्य सरकारने महान त्यागी बाब झुमदेवजी यांच्या जन्मदिनी घेतला तर मला वाटते प्रचंड हा जो मोठा संदेश आहे. तो लोकांपर्यंत जाईल. कारण आपण अनेकांचे जीवन या ठिकाणी बदलवले आहे. या ठिकाणी अनेक मंडळी सांगत होते. की त्यांचे जीवन किती कष्टमय होते.
परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर च्या सौजन्याने तालुक्यातील ग्राम डव्वा पळसगाव येथे आज १० फेब्रुवारी रोजी बिरसा मुंडा यांच्या पटांगणात मानवधर्माचे भव्य सेवक संमेलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी हजारोंच्या संख्येने भाविकांची उपस्थिती होती. संमेलनाचे उद्घाटन परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे संचालक टिकाराम भेंडारकर नागपूर यांचे हस्ते करण्यात आले तर परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे अध्यक्ष राजू मदनकर नागपूर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे माजी सामाजिक न्याय मंत्री इंजि. राजकुमार बडोले उपस्थित होते. तर जिल्हा परिषद सदस्य डॉ. भूमेश्वर पटले, पंचायत समिती सदस्य चेतन वडगाये, डव्वा येथील सरपंच योगेश्वरी चौधरी, गाव तंटा मुक्त समितीचे अध्यक्ष झामा चौधरी, उपाध्यक्ष नरेश प्रधान, माजी जिल्हा परिषद सदस्य किरण गावराने, माजी पंचायत समिती सदस्य जयशीला जोशी, डॉ. डी. बी. राहगडाले, माजी सरपंच वंदना दिहारी, शेषराव भाऊ गीऱ्हेपुंजे तसेच परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूरचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. तर तालुक्यातील सेवकांची हजारोंच्या संख्येने उपस्थिती होती.