विवेक मंदिर सीबीएसई शाळेत वार्षिक क्रीडा महोत्सव उत्सहात साजरा 


गोंदिया, दिंनाक : १० फेब्रुवारी २०२३ :  विवेक मंदिर CBSE शाळेत एकदिवसीय क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते, कार्यक्रमास माननीय शिक्षण अधिकारी महेंद्र गजभिये प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. डॉ. सुमित शर्मा फिजिओथेरपिस्ट डॉ. प्रियेश जयस्वाल ऑर्थोपेडिशियन संजीव बापट शहर प्रतिनिधी जग प्रेरणा अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमाची सुरुवात मार्चपास्टने करण्यात आली, इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी सर्व पाहुण्यांना आदराने क्रीडांगणावर आणले, माँ सरस्वतीची विधिवत पूजा केल्यानंतर इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी रंगारंग कवायतीचे आयोजन केले होते.

ज्याने सर्व पाहुण्यांना मंत्रमुग्ध केले. मनाला आकर्षित केले खेळात विशेष पात्रता असलेले विद्यार्थी व पाहुण्यांच्या हस्ते मशाल प्रज्वलित करून क्रीडा महोत्सवाची सुरुवात झाली. ज्वलंत मशाल हे क्रीडा, ज्ञान आणि जीवनाचे प्रतीक आहे. क्रीडा उत्सवामध्ये सर्व क्रीडा विषयक स्पर्धांच्या उपांत्य व अंतिम फेरी पार पडल्या, त्यात सर्व विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.

विद्यार्थ्यांना संबोधित करताना महेंद्र गजभिये म्हणाले की, कोणत्याही कार्यात यश मिळवण्यासाठी सतत काम करावे लागते. सरावाची गरज असते आणि आपल्या जीवनात खेळ देखील खूप महत्वाचे आहेत. डॉ.सुमित शर्मा म्हणाले की हा कार्यक्रम पाहून बालपणीच्या आठवणींमध्ये हरवून गेलो. शिक्षक आशिष चौहान सर हेमंत कोल्हे सर, शुभांगी ठाकरे आणि सर्व शिक्षक उपस्थित होते. स्थानिक विवेक मंदिर CBSE शाळेत वार्षिक क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. क्रीडा स्पर्धांमध्ये मुलांनी आपले विशेष कौशल्य दाखवले, शेवटी विजेत्यांना प्रमाणपत्र व पदके देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


.

Leave a Comment