सडक अर्जुनी, दिनांक : ११ फेब्रुवारी २०२३ : सुवर्णकार समाज मंडळ सौंदड यांच्या वतीने संत शिरोमणी नरहरी महाराज यांची तालुका स्तरीय पुण्यतिथी उत्सव, संत नरहरी सुवर्णकार समाज भवन, हनुमान वॉर्ड सौंदड येथे दिनांक : १० फेब्रुवारी रोजी संपन्न झाले. कार्यक्रमाचे उद्घाटन सुरेश हर्षे जी. प. सदस्य गोंदिया यांच्या हस्ते करण्यात आले. तर अध्यक्ष स्थानी डॉ. प्रदीप रोकडे जिल्हा अध्यक्ष सुवर्णकार समाज गोंदिया हे होते. सत्कार मूर्ती हर्ष मोदी सरपंच ग्रा. प. सौंदड, भाऊराव यावलकर उपसरपंच ग्रा. प. सौंदड उपस्थित होते, सुवर्णकार समाज मंडळ सौंदड चे अध्यक्ष नितीन यावलकर, उपाध्यक्ष प्रभाकर यावलकर, सचिव राहुल यावलकर होते.
तर विशेष अतिथी स्थानी प्रदीप यावलकर, यशवंत यावलकर, प्रमोद यावलकर, प्रकाश यावलकर, मधुकर यावलकर, कमल परसोडकर, महिला अध्यक्ष स्विटी यावलकर, उपाध्यक्ष माधुरी फाये, सचिव मनीषा फाये उपस्थित होत्या. ह. भ. प. हाडगे महाराज यांचे प्रवचन व कीर्तन, गोपालकाला व महिलांचे हळदीकुंकू कार्यक्रम यावेळी घेण्यात आले. तर सर्वाधिक गुण घेणाऱ्या सुवर्णकार समाजातील १० वी १२ वी च्या विधार्त्यांना रोख बक्षीस देण्यात आले. यावेळी सुवर्णकार समाज बांधवांनी सौन्दड चे सरपंच हर्ष मोदी यांचा सत्कार केला. सुवर्णकार ( सोनार ) समाजाच्या विकासासाठी ( बांधकामासाठी ) शासनाकडे पाठपुरावा करून निधी मंजूर करून देणार असे आश्वासन हर्ष मोदी यांनी मंचावरून केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार राहुल यावलकर यांनी मानले.