सडक अर्जुनी, दिनांक : ०९ फेब्रुवारी २०२३ : तालुक्यात सातत्याने चालू अश्लेल्या अवैध गौण खनिज वाहतुकी चे वृत्त महाराष्ट्र केसरी न्यूज ने प्रकाशित केले होते. त्याची दखल नुकतीच महसूल विभागाणे घेतली आहे. तालुक्यातून विना परवाना वाळू आणि मुरमाचे उत्खनन करून वाहतूक जोमात केली जात होती. त्या मुळे महसूल विभागाला रोज लाखोचा चुना लागत होता. त्याची जाणीव आम्ही प्रशासनाला वृतांच्या माद्यमातून करून दिली. त्या मुळे महसूल विभागाने तालुक्यात पथक तय्यार केले. त्या पथकांच्या माध्यमातून तालुक्यात चालू अश्लेले विना परवाना अवैध मुरूम उत्खनन आणि वाळू उत्खनन करणाऱ्या वाहन धारकांवर कार्यवाई करण्यास सुरवात केली आहे. महसूल विभागाने आत्ता पर्यंत ३ वाहनावर कार्यवाई केली आहे.
हे ही वाचा : स्टाकच्या नावाखाली अवैध रित्या वाळूची डंपिंग; अग्रवाल इंफ्राटेक कंपनीचा कारनामा.
तर नदीपात्रात जाणार्या चोर मार्गावर जेसीबी ने खड्डे निर्माण करून अनेक मार्ग बंद करण्यात आले आहेत. सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम पिपरी, सौन्दड, फुटाळा, सावंगी 1 व 2, तेली घाटबोरी, कोहमारा, वडेगाव, डोंगरगाव, रेंगेपार, खडकी/बामणी, परसोडी, पांढरी/ रेंगेपार, खोडशीवणी आदी नदी व नाल्यातून वाळूचे विना परवाना उत्खनन करून वाहतूक केली जात होती. सध्या रात्रीला महसूल विभागाचे पथक तालुक्यात फिरत अश्ल्याने अवैध उत्खनन करणाऱ्या माफियांचे धाबे दणाणले आहेत. तालुक्यात कार्यन्वित अश्लेली अग्रवाल इन्फ्राटेक नामक कंपनी च्या ट्रेडिंग च्या नावाखाली देखील काही माफिया अवैध रित्या वाळूचे उत्खनन करीत होते. ती वाळू फेब्रुवारी महिन्यात उचलण्यात आली.
हे ही वाचा : स्टाकच्या नावाखाली अवैध रित्या वाळूची डंपिंग; अग्रवाल इंफ्राटेक कंपनीचा कारनामा.