स्टाकच्या नावाखाली अवैध रित्या वाळूची डंपिंग; अग्रवाल इंफ्राटेक कंपनीचा कारनामा.


सड़क अर्जुनी, ( बबलु मारवाडे ) दिनांक : २९ जानेवारी २०२३ : चूलबंद नदीच्या पात्रातुन रेतीची वीना परवाना अवैध रित्या डंपिंग सध्या जोमात चालू आहे. गोंदिया जिल्ह्याच्या सड़क अर्जुनी तालुका अंतर्गत येत अश्लेल्या सौंदड़ ते पिपरी येथिल चुलबंद नदीच्या पात्रातु रेतीची वीना परवाना अवैध रित्या उपसा करुण डंपिंग करण्याचा सपाटा जोमात चालू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार २०२१- २२ मध्ये तालुक्यातील ५ रेतीघाट लिलावात अग्रवाल ग्लोबल इन्फ्राटेक नावाच्या कंपनीने घेतले होते. त्याचे मुदत ३१ सप्टेंबर महिन्यात संपली होती. कंपनीच्या लोकांनी प्रतेक वाळू घाटावर किमान ५०० ट्रीप पेक्षा ज्यास्त वाळू नदीपात्रातून काढून बाहेर ठेवली होती.

नदीघाटावर रात्री तब्बल ३० ट्रकटर होते…

ती वाळू उचलण्यासाठी कंपनीला अंदाजे २ महिन्याचा कालावधी मिळाला होता. त्या नन्तर पुन्हा १५ जानेवारी पर्यंत मुदत वाढ देण्यात आली होती. सदर वाळू सौन्दड येथील एका ठिकाणी डम्पिंग करणे होती. मात्र कंपनीने सदर वाळूची डम्पिंग न करता परस्पर आपल्या कामासाठी वाहतूक केली. विशेष म्हणजे कंपनी सदर वाळूची ट्रेडिंग करिता साठवणूक करणार होती. मात्र वाळू घाटावर वाळूचे स्टाक सध्या उपलब्ध नाही. मग कंपनीने ट्रेडिंग ची परवानगी नेमकी कश्यासाठी काढली हा संसोधनाचा विषय आहे. स्थानिक ठेकेदारांना कंपनीने हातासी धरून प्रतेक घाटावर नदीपात्रातील वाळू काढण्याचा सपाटा चालू केला आहे. दोन दिवसा पूर्वी पिपरी नदीघाटावर रात्री तब्बल ३० ट्रकटर होते.

११२ हा मदत नंबर देखील निशफळ झाल्याचे चित्र…

स्थानिक गावकर्यांनी सांगितले की ठेकेदार अरेरावीची भाषा वापरतात. कुठे तक्रार केली तर वाहनाखाली दाबून मारू अशी धमकी देतात. ११२ नंबर वर फोन लावून पोलिसांना या ठिकाणी आम्ही बोलावले होते. मात्र पोलिसांनी कुठलीही कार्यवाई केली नाही असे गावकरी सांगत होते. वाळू माफियांच्या दहसतीमुळे शेतकरी देखील त्रस्त आहेत. पोलीसानाचा ११२ हा मदत नंबर देखील निशफळ झाल्याचे चित्र आहे. वाळू माफियांनी सर्वांना विकत घेतल्याची चर्चा आहे. तहसीलदार गणेश खताडे यांना तालुक्यातील पत्रकारांचा सिस्टमंडळ भेटला असता पत्रकारांनी तालुक्यातून होणारा विनापरवाना उपसा थांबवावा आणि कायदेशीर कार्यवाई करावी असे सांगितले यावर त्यांनी दुजोरा दिला.  तालुक्यातून वाळू आणि मुरूम विना परवाना उत्खनन करून वाहतूक केली जात आहे. त्या मुळे प्रशासनाला रोज लाखो रुपायाचा चुना लागत आहे. नदीपात्रात मोठे खड्डे निर्माण झाले आहेत. रात्रीला चोरी करून दिवसाला ट्रेडिंग ची इमानदारी दाखविली जात आहे. असे असताना देखील तालुक्यातील प्रशासन मुंग गिळून गप्पा आहे.


 

Leave a Comment