गोरेगाव, दिनांक : २९ जानेवारी २०२३ : गिधाडी येथील जि. प. शाळेला १५० वर्षे पूर्ण झाली त्या अनुषंगाने शाळेचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव तसेच सावित्रीबाई फुले जयंती निमित्ताने शालेय वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम आयोजित केले गेले. या कार्यक्रमांचे उद्घाटन डॉ. सुगत चंद्रिकापूरे यांच्या हस्ते करण्यात आले. स्वातंत्र्यपूर्वकाळात स्थापन झालेल्या या शाळेतून शिकलेल्या विद्यार्थ्यांना देशप्रेमाची व राष्ट्रीय मूल्यांची शिकवण मिळाली. अनेक माजी विद्यार्थी सैनिक, पोलिस व फौजदार या पदावर कार्यरत झाले.
त्यामुळे सैनिकांचे गाव, फौजदारांचे गाव म्हणून गावास जिल्ह्यात नावलौकीक मिळाला. आजही देशरक्षणासाठी गावातील अनेक तरुण सिमेवर कार्यरत आहे. डॉक्टर, इंजिनिअर, प्राध्यापक, माध्य.-प्राथ. शिक्षक, शिक्षण क्षेत्र, बांधकामक्षेत्र, आर्थिक, सामाजिक, प्रचार प्रसार क्षेत्र, उद्योजक व व्यावसायिक अशा अनेक क्षेत्रात आजही शाळेचे माजी विद्यार्थी यशाची उंच उंच शिखरे गाठत आहे. अशा प्रत्येक विद्यार्थ्यांचा निश्चितच शाळेस अभिमान आहे. असे मनोगत डॉ. सुगत चंद्रिकापुरे यांनी व्यक्त केले. तसेच शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व समजावले व प्रोत्साहीत केले.
त्यावेळी पंकज मनोज बोपचे पं. स. सभापती गोरेगाव, कैलाश डोंगरे, प्रितीताई कतलाम जि.प. सदस्या, पुष्पाताई जैतवार सरपंच ग्रा.प. गिधाडी, लिनाताई बोपचे प. स. सदस्या, रामेश्वर महारवाडे प.स. सदस्य, सोमेश रहांगडाले, बाबा बीसेन, लालचंद चौव्हान, सुरेंद्र रहांगडाले, राजकुमार बोपचे, बी. टी. टेंभरे, चंद्रशेखर ( गुड्डू ) बोपचे, चौकलाल येडे व ग्रामस्थ सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.