नायलॉन माज्याने गळा चिरल्याने २९ वर्षीय युवक गंभीर जखमी; मदतीचे आव्हाहन!

 


सौन्दड, ( बबलू मारवाडे ) दिनांक : २९ जानेवारी २०२३ : गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी अंतर्गत येणारे ग्राम सौन्दड येथील २९ वर्षीय युवक नामे तेजराम टेकचंद नागरिकर या युवकाचा चायनीज माज्याने गळा चीरल्याने त्याला गंभीर दुखापत झाली आहे. सदर वेक्ती मकर संक्रातीच्या निमित्ताने आपल्या स्वगावी सौन्दड येथे आला होता. दिनांक : २२ रोजी रविवारला तो नागपूरला जात असताना नरेंद्र नगर रोडवर पुलाच्या खाली गळ्याला चायनीज माज्या लागल्याने त्याचा गळा चिरला गेला अश्यात त्याच्या गळ्याच्या तीन नसा कापल्या गेल्या मोठ्या प्रमाणात रक्त स्त्राव झाल्याने त्याला उपचाराकरीता नागपूर येथील आरोग्यंम हॉस्पिटल मध्ये भरती करण्यात आले.

त्याच्या उपचारासाठी जवळपास ५ लाखाचा खर्च आहे. तेजराम ची आर्थिक परिस्थिती हलाकीची अश्ल्याने त्याला तुमच्या मदतीची गरज आहे. तो नागपूर येथे ईपी गमिया नामक कंपनीच सेल्स मार्केटिंग चे काम करते. गावातील काही युवकांनी सोसलं मिडीयावर एक मेसेज टाकल आहे. त्या माध्यमातून तुम्हाला होत असेल तसी त्यांना मदत करावी असे आव्हाहन करण्यात आला आहे. फोन पे क्रमांक – 9689897195 किंवा खाते क्रमांक. 50100371808909, IFSC code. HDFC0001786 . Neme. Tejram Tekchand nagrikar , Bank name HDFC Bank LTD.

  • हाच सन एखान्द्याचे जीवन देखील उधवस्त करू शकते…

दर वर्षी मकर संक्रांतीच्या औचित्याने पतंग मोहोत्सवाचे देशभर आयौजन केले जाते. अश्यात पतंग खेळणाऱ्या शौकीनांमध्ये पतंग कापण्याची शर्यत लावली जाते. त्यासाठी धारधार चायनीज मांज्याचा वापर ही मोठ्याप्रमाणात केला जाते. चायनीज मांज्याला देश्यात विक्री करिता बंदि अशली तरी अवैध रित्या मोठ्या प्रमाणत याची विक्री केली जाते. प्रशासन यावर कार्यवाई जरी करीत अशले तरी पाहिजे ते परिमाण मिळत नाही. परिणामी अनेकांच्या जीवावर बेतते. पतंग मोहोत्सव निमित्ताने एखांदी पतंग जेवा दुशर्या वेक्ती द्वारे कापली जाते तेवा कापलेली पतंग ही हवेत तरंगत असते किवा एखान्द्या झाडावर पडलेली असते अश्यात हवेत तरंगत अश्लेला धागा म्हणजेच चायनीज मांज्या रस्त्याने जाणार्या वाहन धारकांच्या गळ्याला लागल्याने वाहन धारकांचा गळा कापला जाते. त्यात त्याला गंभीर दुखापत देखील होते. वेळीच उपचार न मिळाल्यास त्याचा जीव देखील जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. मकर संक्रांतीचा सन हा तीळ गुळ घ्या आणि गोड गोड बोला असे म्हणण्याचा आहे. मात्र हाच सन एखान्द्याचे जीवन देखील उधवस्त करू शकते यांचा अंदाजही आपल्याला नाही.  त्यामुळे चायनीज माज्याचा वापर टाळावे असे आव्हाहन आम्ही यानिमित्ताने करीत आहोत.


 

Leave a Comment