गोंदिया, दिनांक : २९ जानेवारी २०२३ : तिरोडा पोलिसांच्या हद्दीतील घाट कुरोडा घाट आणि वैनगंगा नदी पात्रात काही लोक अवैधरित्या रेतीचे उत्खनन करून वाळूची चोरी करून वाहतूक करीत अश्ल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यावर छापा घालून पोलिसांनी कारवाई केली. यात 2 ट्रॅक्टर ट्रॉली सह 1 ब्रास वाळू, किंमती 12 लाख 4 हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर प्रकरणी आरोपी ट्रॅक्टर चालक नामे 1) विजय फुलचंद खंगार, वय २७ वर्ष रा. घाटकुरोडा ता. जि. गोंदिया, 2) दिनकर सुरदास मेश्राम, वय ३२ वर्ष रा. घाटकुरोडा ता. तिरोडा जि. गोंदिया, यांचे विरुद्ध घाटकुरोडा वैनगंगा नदी पात्रातून अवैध रित्या वाळूचे उत्खनन करून स्वतः चे आर्थिक फायद्याकरीता शासनाचा महसूल बुडवून रेतीची चोरी प्रकरणी पोलीस ठाणे तिरोडा येथे कलम 379, 34 भारतिय दंड संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
आरोपीना तिरोडा पोलीसांचे स्वाधीन करण्यात आले आहे. गुन्ह्याचा पुढील तपास तिरोडा पोलीस करीत आहेत. सदरची धडक कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक अशोक बनकर यांचे मार्गदर्शना खाली संकेत देवळेकर उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी यांचे विशेष पथकातील पोलीस अंमलदार पो. हवा. सुजित हलमारे, महेश मेहर, पो. ना. शैलेश कुमार निनावे, दयाराम घरत, चापोशी हरिकृष्ण राव यांनी अथक परिश्रम घेवून कामगीरी केलेली आहे.